प्रतिष्ठा न्यूज

पवित्र मत्रांच्या जपाने उद्धार होतो : परमपूज्य परमात्मराज महाराज (आडी )

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जसा भाव ठेवाल तसे फळ मिळत असते,कोणतीही साधना करताना चांगली भावना ठेवणे आवश्यक आहे पवित्र मंत्राच्या जपाने उद्धार होतो,स्थानाचे महत्त्व वाढवण्यासाठी पवित्र मंत्राचा जप केला जातो,असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.ते वंदूर (ता. कागल) येथे हार्दायन श्री दत्त देवस्थान आडी आणि परमात्मराज अधिष्ठान वंदूर यांच्यावतीने हॉस्पिटल निर्माण कार्यस्थळी आयोजित पवित्र संगोष्ठी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी हॉस्पिटल निर्माण स्थळी आयोजित पवित्र संगोष्ठी कार्यक्रमांतर्गत सकाळी सव्वा आठ पासून वैश्विक मंत्र जय परेश सर्वायण या मंत्राचा जप हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी हॉस्पिटल इमारती मध्ये स्थापित व्यासपीठ आणि हॉस्पिटल चा परिसर रांगोळी व केळीच्या फांद्यानी,फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.विठ्ठल खोत व सागर माने यांच्या नेतृत्वाखाली वैश्विक मंत्राचा जप करण्यात आला.यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले,जीवनामध्ये पवित्र मंत्राचा स्वीकार करून जप करावा,काही मंत्र अनिष्ट असतात.उदा.जारण,मारण, उच्चाटन अशा अनिष्ट मंत्राचा जप काही लोक करीत असतात.पण तशां मंत्रांमुळे हानी होते.पवित्र मंत्राच्या जपाने जीवन पवित्र होईल,अनेक धर्म पंथांमध्ये अनेक पवित्र मंत्र आहेत.  सर्व मंत्रांना एकत्र आणणारा,सर्व मंत्रांचे सार असलेला जय परेश सर्वायण हा वैश्विक मंत्र आहे. कोणत्याही धर्मपंथातील,संप्रदायातील लोकांना आपल्या इष्ट दैवताच्या नामाबरोबर वैश्विक मंत्राचा जप करून इष्ट साध्य प्राप्त करता येते.हिंदूंप्रमाणे मुस्लिम,ख्रिश्चन इत्यादी भाविक लोकही वैश्विक मंत्राचा जप करून अनुभव घेत आहेत.नाना धर्म संप्रदायांना जोडणारा,सर्वांना घेऊन चालणारा हा वैश्विक मंत्र आहे.मंत्रणा म्हणजे सल्ला असा अर्थ होतो.पवित्र सल्ल्याने उद्धार होतो.पवित्र मंत्ररूप पवित्र सल्ल्यानेच जीवनात उद्धार होतो.मन पवित्र असेल तर फळ चांगले व जास्त मिळते.नरिष्यंत राजाच्या मनाची भावना पूर्ण अहिंसक होती.बुद्ध,महावीर,पतंजली महर्षी यांनीही अहिंसक मार्गाचे महत्व सांगितले आहे.नरिष्यंत राजा पूर्ण अहिंसक व दुसऱ्याचे कल्याण चिंतणारा होता,सामान्य मानवही त्याच्याप्रमाणे बनू शकतो.दत्त,शिव, राम,कृष्ण,बुद्ध,महावीर,अल्लाह, ख्रिस्त इ.कोणतेही नांव घ्या,पण सर्वांच्या सोयीसाठी वैश्विक मंत्र पवित्र मंत्र आहे,असे सांगितले.यावेळी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,युवानेते अमित पाटील सांगली,अजित पाटील बस्तवडे,तसेच उपस्थित उद्योजक सदाशिवराव वाळके,महादेवराव वाळके अकीवाट, अभियंता विठ्ठल मगदूम कोल्हापूर, उद्योजक राजगोंडा बाबगोंडा पाटील कोगनोळी,उदय वाशीकर हुपरी, दीपकराव कदम हणबरवाडी,पोपट महादेव खोत हणबरवाडी,मिलिंद पिंजारे कोल्हापूर,सतीश भोजे हुपरी,  शंकर पाटील हुपरी,अक्षय माळी हुपरी,निलेश खोत कुवेत,दत्तात्रेय भिलवडे,मारुती सूर्यवंशी,शिवाजीराव मोरे कणेरीवाडी,दिपकराव मोरे,रविंद्र मोरे कणेरीवाडी,शिवाजी इंगळे वंदूर, यशवंत मोरे कणेरीवाडी,शितल जंगम कागल,शशिकांत वारके,निखील पाटील,अरविंद मांगुरे गो.शिरगांव आणि मान्यवरांचा प.पू.परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी वंदूर,मत्तिवडे,सुळगांव,कोगनोळी हणबरवाडी आडी बेनाडी हंचिनाळ सौंदलगा म्हाकवे आणूर,हुपरी इ. गांवासह निपाणी,कागल,कोल्हापूर बेळगांव परिसरातील व महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या असंख्य भाविकांनी वैश्विक मंत्रजप,प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.