प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2024-25 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण उमेदवारांना भरती करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्हयातील आयटीआय /अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -78, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर- 4, अॅटो इलेक्ट्रीशियन-13, शिट मेटल वर्क्स-18, पेंटर ( जनरल) -2, वेल्डर (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीक)- 3 व डिग्री/ डिप्लोमा इन मेकॅनिकल/ अॅटोमोबाईल इंजिनीअरींग 2 अशी एकुण 120 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षित आहेत.) त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व अॅटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in व
डिग्री/डिप्लोमा इन मेकॅनिकल/ अॅटोमोबाईल इंजिनीअरींग उत्तीर्ण उमेदवारांनी www.mhrdnat
s.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नंतर एमएसआरटीसी विभागीय कार्यालय
नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करुन महामंडळाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक राहील. हे छापील अर्ज 11 ते 19 जानेवारी 2024 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुटटीचा दिवस वगळुन विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे मिळतील व लगेच स्वीकारले जातील. या अर्जाची किंमत खुल्या प्रवगाकरीता 590 रुपये व मागास वर्गीयांसाठी 295 रुपये आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.