प्रतिष्ठा न्यूज

हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवंगत भाई डॉ.धोडगे यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हाळदा ता.कंधार जि.नांदेड  येथे शाळेचे संस्थापक संचालक दिवंगत डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांची जयंती साजरी करण्यात  आली. तसेच यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश चंदरराव बुरपल्ले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून – प्रा. डॉ. हनुमंतराव भोपाळे, साहेबराव पाटील शिंदे, राम मंदावाड, भुजंगराव पाटील, राजेश शिरसाठ हे होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक आदींनी दिवंगत डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्र. मुख्याध्यापक विवेक बुरपल्ले तर सूत्रसंचलन आर. जी. गुजरवाड यांनी केले. याप्रसंगी गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.