प्रतिष्ठा न्यूज

महानगरपालिकेकडून दिनांक ११ ते १३ जुलै २०२३ अखेर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन ; महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ११/०७/२०२३ ते दिनांक १३/०७/२०२३ अखेर वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले.
महापौर सुर्यवंशी म्हणाले की, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जाते. सन २०२३ हे वसंत व्याख्यानमाला आयोजनाचे २८ वे वर्ष आहे. वसंत व्याख्यान मालेचे उदघाटन माझ्या हस्ते आणि उपमहापौर उमेश पाटील यांचे अध्यक्षेतखाली व आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी स्थायी समिती सभापती धीरज सुर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे , विरोधीपक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादी मैनुदीन बागवान , महिला बालकल्याण समिती सभापती अस्मिता सलगर, समाजकल्याण सभापती सौ. अनिता वनखंडे, यांच्यासह संयोजक समिती सदस्य कल्पना कोळेकर, सौ.रोहीणी पाटील, डॉ.नर्गीस सय्यद, आदी सन्मानिय उपस्थित राहणार आहेत. वसंतव्याख्यान मालेचे उदघाटन मंगळवार दिनांक ११ जूलै २०२३ रोजी सांय. ५.३० वाजता रोटरी हॉल, स्विमिंग टॅक जवळ, गणेशनगर, सांगली. येथे संपन्न होणार आहे. त्यानंतर दररोज सांय ६.०० ते ८.०० वाजे पर्यत व्याख्यान संपन्न होणार आहे.
या व्याख्यानमालेसाठी वेगवेगळया विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यासाठी नामवंत वक्त्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता डिग्रज येथील वसंत हंकारे यांचे तणावमुक्त जीवनाकडे या विषयावर ते बुधवार 12 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे आजचे शिक्षण आणि आव्हाने या विषयावर तर गुरुवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजीराव पुरळेकर कोल्हापूर यांचे आजच्या काळात मधू दंडवते यांच्या आठवणीची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर व्याख्यानमालेसाठी समस्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान आणि सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.