प्रतिष्ठा न्यूज

अमरनाथ आणि हिमशिखरे पुस्तकाचे थाटात प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज /राजू पवार 
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, प्रेक्षागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अंबरनाथ आणि हिम शिखरे लेखिका मंगला देविदास फुलारे यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णन पुस्तकाचे माजी मंत्री श्री डी पी सावंत यांच्या हस्ते सायंकाळी दि.26 डिसेंबर रोजी   थाटात प्रकाशन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या तथा गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री हेमंत पाटील या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका आशा पैठणे, डॉक्टर कल्पना जाधव, दैनिक प्रजावाणी मानसी पुरवणी संपादक श्रीमती अनुजाताई डोईफोडे, डॉ.प्राची पाटील,डॉ सीमा फुलारी,डॉ.संजीवनी डांगे,प्रा.स्वाती कान्हेगावकर, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर, दत्ता डांगे, शंकर विभुते, साहित्यिक दिगंबर कदम,प्रा.महेश मोरे,शंकर वाडेवाले, माजी महापौर  आनंद चव्हाण,दामोदर गुट्टे,डॉ.संभाजी पाटील, डॉ.माणिक गाडेकर, डॉ.अच्युत बन,  आदीजण उपस्थित होते.
      यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, संपादक अनुजाताई डोईफोडे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील,लेखिका आशा पैठणे,डॉ.कल्पना जाधव तसेच धर्मभूषण अॅड दिलीप ठाकूर, दत्ता डांगे, डॉ.अच्युत बन    यांनी मनोगत, विचार व्यक्त केले.
     यावेळी प्रस्ताविक विचार लेखिका मंगला फुलारी  यांनी व्यक्त केले .
   कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. शिराळे धाराशिवकर यांनी केले तर आभार प्रणव फुलारी यांनी व्यक्त केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.