प्रतिष्ठा न्यूज

लोढ्याच्या संतोषन वाचवले महिलेचे प्राण,एनसीसी शिबिरात मिळालेलं प्रात्यक्षिक आले कामी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका वृध्द महीलेच हृदय बंद पडलं, पळापळ सुरु झाली काय करायचं कुणाला कळना, मात्र तासगाव तालुक्यातल्या लोढ्याच्या संतोष पाटीलनं कॉलेजमध्ये एनसीसी शिबिरात मिळालेलं सीपीआर प्रात्यक्षिक वापरत बंद पडलेलं हृदय चालू करत महिलेचे प्राण वाचवले. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील कामती येथे घडला. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डी बी एफ एनसीसी कंपनीचा गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर संतोष सुनिल पाटील व दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूरचा विद्यार्थी व ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचा छात्र आहे. संतोष शुक्रवारी  आठवडी परेडसाठी बेगमपूर येथून महाविद्यालयासाठी निघाला असता कामती गावात तो नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी दुपारी अकराच्या दरम्यान एक ५८ वर्षीय वयोवृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका येत खाली कोसळली,झटक्याच्या वेदनेने ती तडफड करत शांत झाली.बाजूची मंडळी घाबरून गेली.काय करायचे कुणाला सुचेना,संतोषन तात्काळ धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला कुणी कांदा,चप्पल नाकाला लावायचा सल्ला दिला.मात्र त्याने  वेळ वाया न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वाशोश्वास बघितला व त्याला एनसीसी शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआरची आठवण झाली.त्याने छातीवर दाब देत सीपीआर महिलेला वेळेत दिला,त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली.बंद पडलेलं हृदय संतोषन चालू करत प्राण वाचवले. यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले.
चौकट:दिल्लीतील परेडला चार राज्यांचे नेतृत्व:संतोष पाटीलने २६ जानेवारी २०२३रोजी दिल्ली येथे कर्तव्य पद वर महाराष्ट्र निर्देशालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचे नेतृत्व केले होते. या  समूहामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या चार राज्यांचे नेतृत्व केले,त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सन्मान  करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.