प्रतिष्ठा न्यूज

संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृति समारोहा निमित्त बुधवारी नाशकात राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
नाशिक  प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेला अभिनय आणि गायनाच्या माध्यमातून भारतीय संगीत रंगभूमीला सु niवर्णयुगात नेणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या 102 व्या स्मृती समारोह निमित्त संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन बुधवार दि. 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलीप साळुंखे यांनी पत्रकान्वय प्रसिद्धीस दिली आहे.
गंगापूर रोडवरील राजुर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात या  परिषद मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असून दुपारी 2 वाजता उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. संजय पाटील, विभागीय अध्यक्ष दिपक भदाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे, उद्योजक कक्षाचे विशाल देसले. आदि उपस्थित राहणार आहेत.
तीन सत्रात  विभागलेल्या या परिषदेत प्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील, प्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक भोजराज चौधरी यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय वाटचाली संदर्भात मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी संगीत नाटकातील  गितांचे सादरीकरण होणार आहे.
समारोप सत्रात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील आणि सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे वंशज  असलेल्या परिवारातील सदस्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या सांस्कृतिक चळवळीचा आणि विशेष वैभवाचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमासाठी कलाक्षेत्रासह विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील मान्यवरांसह रसिक श्रोत्यांसह मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने मनोज आमले, ॲड. माधव मुधाळे, उल्हास बोरसे, संदीप सोमवंशी, उमेश शिंदे, सुनील घुले, अमित पवार, सागर पाटील, मंगेश टर्ले, अरविंद देशमुख, बाळासाहेब आमरे, अमोल पाटील, विक्रम कदम कुणाल देसले आदिंनी केले आहे.
संपर्क
दिलीप साळुंके
[राष्ट्रीय कार्याध्यक्ष ] संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत (गणराज्य)
94045 75100

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.