प्रतिष्ठा न्यूज

सापुतारा (गुजरात) येथील आंतरराज्य काव्य संमेलनात डॉ.प्रतिभा पैलवान यांची कविता सर्वोत्कृष्ट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांची सापुतारा गुजरात येथे झालेल्या आंतरराज्य कवी संमेलनासाठी निवड झाली होती या निमित्ताने घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेमध्ये डॉ.पैलवान यांच्या “फिर से कहो” या कवितेला सर्वोत्कृष्ट कवितेचा बहुमान मिळाला.
निसर्गाच्या सानिध्यात आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या कवी संमेलनामध्ये विविध राज्यातून अनेक कवी, साहित्यिक, रसिक उपस्थित झाले होते.
प्रत्येक राज्याची भाषा,साहित्य संस्कृती वेगवेगळी आहे. त्याची एकमेकांना ओळख व्हावी, साहित्यातील संस्कृतीतील वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करता याव्यात, या उदात्त हेतूने या कवी संमेलनाचे आयोजन बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिकचे अध्यक्ष आणि नक्षत्र काव्य मंचचे सर्वेसर्वा माननीय श्री महेंद्र देशपांडे यांनी केले होते.
नवोदित साहित्यिक कवींना देखील यामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.हे कवी संमेलन दोन सत्रांमध्ये पार पडले. या संमेलनाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. संध्याकाळी विविध राज्यातून आलेल्या साहित्यिक कवींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात डॉ. पैलवान यांनी तृतीयपंथीयांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या “तो,ती आणि ते राजहंस” या काव्यसंग्रहाचा विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल डॉ.पैलवान यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता भांबळ उपस्थित होत्या.,सुवर्णा पवार,श्रीमती रेखा दीक्षित,सापुतारा इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वेसर्वा माननीय ज्योतीताई पटेल माननीय श्री महेंद्र देशपांडे सौ माधुरी देशपांडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.