प्रतिष्ठा न्यूज

*आरक्षण आमच्या हक्काच* म्हणत मराठा बांधवांचा तासगावात विराट मशाल मोर्चा..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावसह तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होताना दिसत आहे.शहरात सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस पूर्ण झाला.दरम्यान काल आंदोलक मराठा कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करून एस टी बसवरील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पोस्टरला काळे फासून निषेध केला.उपोषणस्थळी शेकडो नागरिकांनी,महिलांनी,संघटनानी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.उपोषणास खासदार संजय काका पाटील,युवानेते प्रभाकर पाटील,राष्ट्रवादीचें सुरेश पाटील,यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.तासगाव सह अनेक गावात साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे.काही गावात बंद पाळला जात आहे.आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज मराठा बांधवानी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच म्हणत भव्य दिव्य असा मशाल मोर्चा काढला.सात वाजता जिजाऊ चौक वरचे गल्ली येथून मोर्चा सुरु होऊन उपोषण स्थळी शिवतीर्थ याठिकाणी मोर्चाची सांगता झाली.यावेळी लहान मुलांसह,माता,भगिनीं,तरुण हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा, हर हर महादेव,घोषणा देण्यात आल्या.या मशाल मोर्चास लिंगायत कुंभार समाज तासगाव तालुका,मुस्लिम समाज,आणि नाभिक समाज यांनी जाहीर पाठिंबा देऊन मशाल मोर्चात सहभाग घेतला.मशाल मोर्चाची सांगता शिवतीर्थ येथे श्री शिवछत्रपतींचा ध्येय मंत्र म्हणून झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.