प्रतिष्ठा न्यूज

विसापूर येथे घरास आग संसारोपयोगी साहित्यसह शेतीमाल जळून खाक : सरपंच अशोक मोहिते यांच्याकडून मदतीचे आवाहन…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : विसापूर येथील शेतमजूर तानाजी जगन्नाथ चव्हाण यांच्या छपरास काल सकाळी 11 वाजता अचानक आग लागली,आगीचे कारण अजून समजले नाही, यामध्ये या गरीब शेतमजुराचे घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल जळून खाक झाले.यामध्ये किमान दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून सरपंच अशोक मोहिते यांनी याबाबत त्या गरीब कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदत करण्याचें आवाहन केले आहे. याबाबतचा पंचनामा पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांनी केला आहे.चव्हाण हे शेतमजूर आहेत,सकाळी तें आपल्या पत्नी सोबत दुसऱ्यांच्या शेतात मजुरी साठी गेले होते, तर त्यांची मुले शाळेत गेली होती.सकाळी साडेदहा तें अकराच्या दरम्यान त्यांच्या छप्पर वजा घरास अचानक आग लागली, छप्पर असल्याने आगीने लगेच पेट घेतला.यामध्ये रोख रक्कम सहा हजार,चार पोती गहू, चार पोती शाळू,100 किलो भुईमूग शेंगा,मुलांचे शाळेचे साहित्य,आधार कार्ड सह बँक पासबुक जळून खाक झाले आहे.यावेळी शेजारी बांधलेल्या म्हशीला मोठ्या प्रमाणात भाजले आहे.आग लागल्या नंतर शेजारच्या वस्ती वरील लोकांनी तातडीने जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आजूबाजूला आग पसरली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर, पोलीस पाटील संदीप पाटील,गाव कामगार तलाठी सचिन कुंभार,तसेच ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतली.यावेळी पंचनामा करून चव्हाण कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे सरपंच अशोक मोहिते यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.