प्रतिष्ठा न्यूज
ताज्या घडामोडी

प्रा.भाऊसाहेब गोसावी यांना शब्दशिवार सप्तर्षी साहित्य पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
मंगळवेढा प्रतिनिधी : मंगळवेढा, सोलापूर येथील सप्तर्षी प्रकाशनाने प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या “मालवणी मुलुखातील स्त्री लोकगीते” या लोकसाहित्य संकलन पुस्तकास शब्दशिवार मातोश्री सौ. काशिबाई घुले उत्कृष्ट संकीर्णसंग्रह राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देवून गौरविले आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुस्तकास यापूर्वीच दोन पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. सप्तर्षी प्रकाशन यांचेकडून मिळालेला हा तिसरा गौरव पुरस्कार आहे.
प्रा. गोसावी हे कोकणातील सांवतवाडी, सिंधुदुर्ग येथील मालवणी लेखक आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून तेहतीस वर्षे सेवा करून सध्या ते सेवानिवृत्त आहेत. मालवणी बोलीतील साहित्य लेखन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांनी मालवणी कवितासंग्रह, कथा, नाटक व चित्रपट गीतलेखन केले आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, दक्षिण मराठी साहित्य परिषद, साहित्य कलायात्री जगदीश खेबुडकर, सुरेश कलकर्णी स्मृती पुरस्कार, औदुंबर, राजर्षी शाहू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांच्या शिक्षण सेवा कार्यासाठी त्यांना शिक्षणमहर्षी डाॅ. बापूजी साळुंखे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
त्यांच्या लेखणीतून जीवनातील संघर्षमय जगणे व समाजजीवनातील वास्तव आलेले आहे. मालवणी मुलखाची कविता, तोफा आणि सलामी, भूक हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. माणुसकिच्या हाकेवरचा गाव हा मालवणी कथासंग्रह आहे. धरणाखालचं गाव एकांकिकासंग्रह आहे. जागवा मनाचा जागर पथनाट्य आहे. अनेक बालनाटिका त्यांनी लिहिल्या. चित्रपट गीतलेखन केले. मालवणी अभ्यासक म्हणून त्यांची सध्या ओळख आहे. त्यांच्या मालवणी स्री लोकगीतांना हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.