प्रतिष्ठा न्यूज

सिंहगडच्या १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून “पेंटागाॅन स्पेस” कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून “पेंटागाॅन स्पेस” प्रा. लि. कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
उद्योग आणि व्यावसायिक कंपन्यांशी फलदायी आणि परस्पर फायदेशीर संबंध प्रस्थापित करण्यात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील प्लेसमेंट सेल महत्त्वपूर्ण भुमिका बजावत आहे. प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने सिंहगड कॉलेज विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी जागतिक दर्जाचे संशोधन कुशल माहिती तंत्रज्ञान प्रदान करून त्यांच्या स्वप्नातील नामांकित कंपनीत नोकरी नोकरी मिळवून देणेसाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर अग्रेसर आहे.
महाविद्यालयातील “पेंटागाॅन स्पेस” प्रा. लि. कंपनीत प्रशिक्षणासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील पुनम सावंत, आरती शेळके, सुभाष मोटे, शुभम बाबर, गौतमी कांबळे, निकीता गांवधरे, क्षितिजा पुर्वत, दिपाली वाघमोडे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील मेघा कुटे, शांता लोखंडे, प्रियंका पाटील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील चांगदेव भुईकर, साहिल शेख, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील भक्ती पिसे, आण्णासाहेब लोंढे, सुयोग तोंगले, रोहित माने आदी विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन माध्यमातून साॅफ्टवेअर कंपनीमध्ये आवश्यक असलेले टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण मिळणार असून हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना “पेंटागाॅन स्पेस” प्रा. लि. कंपनीमार्फत वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
“पेंटागाॅन स्पेस” प्रा. लि. कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.