प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये सांगली महापालिका पुणे विभागातील ड वर्ग महापालिकांमध्ये तृतीय

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 सांगलीत मिरज आणि कुपवाड महापालिकेचा पुणे विभागातील ड वर्ग महापालिकांमध्ये तृतीय क्रमांक आला आहे.
या यशाबद्दल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्त सुनील पवार यांचे अभिनंदन केले आहे. या पत्रात म्हटले की , सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने शहरी विकासाप्रती बांधिलकी दाखवत शहर सक्षम बनवण्याकरता दिलेले योगदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची तयारी यामुळे महापालिकेची कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडण्यात आपण यशस्वी झाला आहात. या उल्लेखनीय कामगिरी आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी घेतलेली मेहनत आणि दृढनिश्चय दर्शवतो. पुणे विभागातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. पुढील वर्षी आपले शहर अधिक सक्षम कसे करता येईल यासाठी आपल्याकडील सर्व संसाधनांचे योग्य नियोजन करून लोकाभिमुख व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात यापुढेही अनेक असेच निरंतर कार्य करावे अशा शब्दांमध्ये विभागीय आयुक्त सौरभराव यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त व संपूर्ण प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.