प्रतिष्ठा न्यूज

तासगावात 3 ऑगस्ट पासून व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन.. जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घेण्याचे रोहित पाटील यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील तरूणांना नवनवीन रोजगार उपलब्ध व्हावा तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे व उद्योजकांना नविन उद्योगांच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तासगाव येथील परशुराम मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवानेते रोहीत पाटील यांनी दिली.शिक्षण झाल्यावरही कौशल्य,शिक्षण आणि उपलब्ध संधी यांची सांगड घातली जात नसल्याने बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला योग्य मार्ग गवसण्यासाठी तसेच तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ बेरोजगारीमुक्त होण्यासाठी इथल्या तरुणाईतील कौशल्य,शिक्षण आणि गुणवत्ता यांस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.याच धर्तीवर कौशल्य विकास आधारित विविध नावीन्यपूर्ण आणि भविष्यात उपयोगी पडतील अश्या क्षेत्रातील व्यवसायांचे प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार दि.३ आँगस्ट व रविवार दि.४ आँगस्ट रोजी आयोजित केला असून जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये  सहभाग घ्यावा असे आवाहन युवानेते रोहीत पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.