प्रतिष्ठा न्यूज

‘आनंदी’ त वनभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व आनंदी युवती विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मानसी कांबळे, व उपसरपंच वृंदा पाध्ये यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयातील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. विविध स्पर्धकांनी आपापल्या पाककृतींची सुबक आणि आकर्षक मांडणी केलेली होती, त्यांनी प्रदर्शनात मांडणी केलेल्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगून सुदृढ शरीरयष्टीसाठी त्यांच्या सेवनाबद्दलची माहिती सांगितली. पाककला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्यापैकी प्रथम क्रमांक- कु. सायमा महालदार, द्वितीय क्रमांक- कु. शर्वरी कांबळे आणि तृतीय क्रमांक- कु. श्रावणी भूतल या विद्यार्थिनींनी मिळवले. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे २०० विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सहभागीनीं घेतला. या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील , संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई,सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष भोसले व आनंदी युवती विकास मंचच्या समन्वयक प्रा. एस. एस घाटगे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.