प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यात प्रथमच.. आधुनिक तंत्रज्ञानाने अवघ्या पंधरा गुंठ्यात कलिंगडाचे लाखाचे उत्पन्न

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२१ : सांगशी, ( ता. गगनबावडा ) येथील तरुण शेतकरी मनोज महादेव पडवळ यांनी’ क्रॉप कव्हर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून पीक संरक्षण खर्चात बचत करत अवघ्या पंधरा गुंठे क्षेत्रात तब्बल एक लाखाचे उत्पन्न मिळवून आजच्या तरुणाई पुढे आदर्श निर्माण केला आहे.
वातावरण बदलामुळे शेती संरक्षण खर्च वाढत आहेत. अशावेळी तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यात बचत करण्यासाठी शेतकरी सतत धडपडत असतो.
मनोज यांनी १८ फेब्रुवारीला १८०० रोपांची लागण करून साठ दिवसांच्या कालावधीत कलिंगडाचे दहा टन उत्पादन घेतले. त्यांनी सरासरी दहा रुपये किलो दराने विक्री केली. चाळीस हजार खर्च वजा जाता साठ हजार रुपये निव्वळ नफा झाला. गगनबावडा तालुक्यात प्रथमच कलिंगडा साठी क्रॉप कव्हर चा वापर केला गेला आहे.
एकूण पिकाच्या कालावधीमध्ये फक्त दोन फवारण्या कराव्या लागल्या. या भागामध्ये वन्य प्राण्यांचा विशेषता गवा रेडे, मोर,लांडोर यांचा वावर अधिक आहे. ते पिकांचा फडशा पडतात. क्रॉप कव्हर असल्यामुळे पिकाचे संरक्षण झाले.

“गगनबावडा तालुक्यात प्रथमच कलिंगड पिकासाठी क्रॉप कव्हर चा वापर केला आहे. त्यामुळे पिकावर उष्णता, कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.व त्यामुळे पीक संरक्षणाच्या खर्चात बचत होते.”
– मनोज पडवळ

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.