प्रतिष्ठा न्यूज

निसर्गाच्या कृपेने मान्सूनच्या पहिल्याच पावसाने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली

प्रतिष्ठा न्यूज /अनिल शिंदे
सावळज : कित्येक वर्षांपासून निसर्गावर अवलंबून असलेल्या सावळज गावावर अखेर निसर्गाने कृपा केली आणि पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने अग्रणी नदीला समाधानकारक पाणी आले आणि अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली
सावळज गाव गेली कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करीत आहे, गेल्या दोन वर्षात तर खूपच कमी पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांना आपली शेती व पशुधन वाचविण्यासाठी अतोनात संघर्ष करावा लागला होता सध्यस्थीत येथील शेती व शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पहात असतो.
 प्रत्येक वर्षी थोडया फार प्रमाणात का होईना पण या भागात समाधानकारक पाऊस होत असतो पण या वर्षी मात्र कडक उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले पाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागला पण त्या संघर्षास यश आले नाही म्हणूनच की काय निसर्गाची कृपा झाली आणि अग्रणी दुथडी भरून वाहू लागली.
 सावळज व परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सिद्धेवाडी तलाव व अंजनी तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत, आजमितीसही परिसरातील ओढे,नाले वाहते झाले आहेत, किमान येणारा उन्हाळा सुखकर जाईल तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.