प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलाकडुन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी :सांगली जिल्हा पोलीस दलाकडुन देशात तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतात पुर्वी भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ आणि भारतीय पुरावा अधिनियम १८७२ हे कायदे अंमलात होते. बदलत्या काळानुसार कायदयात योग्य ती सुधारणा करून त्या ठिकाणी नवीन भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष संहिता २०२३ असे कायदे तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी देशभरात १ जुलै २०२४ पासून करण्यात येत आहे.

नवीन कायद्यांच्या अनुशंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणेस प्रभारी अधिकारी यांनी नवीन लांगु होणाऱ्या कायद्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करणेकरीता आज रोजी त्यांचे स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुन्हे नोंद करून घेणेकरीता सीसीटिएनएस प्रणालीचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.