प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यातील 25 महसुल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित व सवलती लागू : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रं. एससीवाय-2023/प्र.क्र.37/म-7 दि.10 नोव्हेंबर 2023 नूसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूली मंडळा मध्ये जुन ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि. पेक्षा कमी झाले आहे. अशा नांदेड जिल्हयातील खालील 8 तालुक्यातील 25 महसूली मंडळा मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती मा. जिल्हाधिकारी- अभिजित राऊत, नांदेड. यांच्या दि.13 नोव्हेंबर 2023 च्या आदेशानुसार घोषित केलेली आहे. ती खालील प्रमाणे आहेत.
(1) हदगाव तालुका-  निवघा, पिंपरखेड (2) नांदेड तालुका- नांदेड वजिराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णूपुरी, तरोडा बु. (3) हिमायतनगर तालुका- सरसम, जवळगाव 4) नायगाव खै.तालुका- कुंटुर, नायगाव खै. बरबडा (5) कंधार तालुका- कुरुळा, फुलवळ, पेठवडज, उस्माननगर, बारुळ (6) मुखेड तालुका- मुखेड, जांब बु. मुक्रामाबाद (7) लोहा तालुका- कापसी (बु.), कलंबर, सोनखेड (8) देगलूर तालुका- हणेगाव,
तसेच मा.जिल्हाधिकारी- अभिजीत राऊत, नांदेड, यांनी वर नमूद केलेल्या तालुक्यातील 25 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील प्रमाणे सवलती लागू करण्याची मंजूरी देत असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.
(1) जमीन महसूलात सूट. (2) सहकारी कर्जाचे पुनर्गठन. (3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. (4) कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5% सूट. (5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी. (6) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता. (7) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्सचा वापर. (8) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती दिल्या आहेत. तेव्हा सर्व संबंधीत विभाग प्रमुख यांनी नांदेड जिल्हयातील 25 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या गावातील खातेदारांना उपरोक्त उपाययोजना व सवलती देण्याची व्यवस्था करावी असे आवाहन मा.जिल्हाधिकारी- अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.