प्रतिष्ठा न्यूज

मोर्चा व उपोषणाच्या दिलेल्या इशारानंतरच,विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीमध्ये करण्याचे दिले आश्वासन – राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोल्हापूर मध्ये असणारे शिवाजी विद्यापीठ,या विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यामध्ये व्हावे म्हणून मागील अनेक वर्षापासून सांगलीकरांची धडपड चालू आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, अनेक पक्षाचे पदाधिकारी, नेमलेली समिती, सर्व पक्षाचे नेते आमदार,खासदार,मंत्री यांनी अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र चालू झाले नाही.म्हणून आम्ही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. डी. टी.शिर्के सर यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो,परंतु त्यांची भेट न झाल्यामुळे कुलसचिव माननीय डॉ. व्ही एन शिंदे सर यांना भेटून निवेदन दिले. त्यावेळेला आम्ही सांगितले  की सांगली जिल्ह्याच्या जत सारख्या दुर्गम भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका व कर्नाटका बॉर्डर शेजारी असणारा व कोल्हापूर पासून शेवटच्या टोकापर्यंत हे अडीशे किलोमीटरचे आंतर आहे. या भागातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शैक्षणिक काम करण्यासाठी येण्याकरिता अर्धा दिवस लागतो, सीनियर महाविद्यालयातील व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक वेळा कागदपत्रासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी वारंवार यावे लागते,यामुळे मुलांचे श्रम,पैसा,वेळ,वाया जाते तसेच अनेक गोर गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे नसते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यामध्ये सुरू करावे, म्हणून निवेदन देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी आलो होतो, परंतु विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. डी.टी.शिर्के सर यांची भेट झाली नाही म्हणून आम्ही शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉ. व्ही. एन.शिंदे सर यांना भेटून व त्यावर सविस्तर चर्चा केली या वेळेला आम्ही सांगितले की आपण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरात लवकर सांगली जिल्ह्यामध्ये चालू नाही केल्यास या शिवाजी विद्यापीठावर सांगली ते कोल्हापूर अशी मोटरसायकल रॅली काढली जाईल, तरीही उपकेंद्र सांगलीला दिले नाही,तर छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर विद्यापीठाच्या समोर  कोल्हापूर येथे उपोषणास  बसण्याचा इशारा दिला. यावर माननीय कुलसचिव डॉ. व्ही एन. शिंदे सर म्हणाले की  सांगली जिल्ह्यामध्ये जागा आणि इमारत बांधण्यासाठी निधी उभा करा ,मग आम्ही तुम्हाला विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही निश्चित केलेल्या जागेवरती सर्वजण मिळून भव्य इमारती द्वारे उभे करू, असे ठामपणाने सांगितले. यावेळी आम्ही कुलसचिव माननीय डॉ.व्ही. एन. शिंदे सरांचे

आभार मानले व येत्या काही  महिन्यामध्ये आम्ही सांगलीमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र चालू करण्या संदर्भात सर्वमताने समिती नेमली जाईल व या समितीचा अहवाल आल्यानंतरच जागा आणि निधी उपलब्ध करून सांगली जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे असे मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी  कुलसचिव यांना सांगितले.त्या वेळेला आम्ही विद्यापीठाच्या बाहेर कोल्हापुर येथे फटाके वाजवून, गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.