प्रतिष्ठा न्यूज

हर हर च्या गजरात आणि नयनरम्य आतिषबाजीत कवठे एकंदचा दसरा व पालखी सोहळा संपन्न… पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : आराध्य दैवत श्री सिद्धराज महाराज यांचा दसरा विजयादशमी दिवशीचा पालखी सोहळा हर हर च्या गजरात आणि भव्य आतिषबाजीत भक्तीमय वातावरनातं शांततेत पार पडला.कवठे एकंदला सुमारे 350 वर्षापासूनची आतिषजीची परंपरा असून,गावातील सुमारे 150 ते 200 दारू शोभा मंडळे 15 दिवस अहोरात्र दारू काम करतात.यावर्षी परंपरेने,आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हर हर गजरात सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तब्बल 14 तास हा पालखी सोहळा सुरु होता.तसेच नागाव कवठे येथे ही दसऱ्यानिमित्त नागनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.संपूर्ण वेशीला प्रदक्षिणा घालून हा सोहळा पार पडला.पालखी समोर नयनरम्य आतशाबजी करण्यात आली.यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त आणि अचूक नियोजन यामुळे केल्याने सोहळा शांततेत व सुरळीतपने पार पडला.
श्री सिद्धराज मंदिरामध्ये श्रीं ची पूजाअर्चा होऊन मंदिरातील पालखी प्रदक्षिणा परंपरेने मर्यादित लोकांच्या उपस्थित झाली.मंदिराच्या बाहेरील ग्राम प्रदक्षिणा फुलानी सजवलेल्या पालखीतुन रात्री 8.30 वाजता मंदिरातून बाहेर पालखी आल्यानंतर एसटी स्टँड येथील शिलंगण चौकात चव्हाण – पाटील कट्टा येथे श्री सिद्धराज महाराज व श्री बिरदेव महालिंगराया यांच्या मूर्तीची पूजाअर्चा होऊन दसऱ्याचे आपटा पुजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. चव्हाण- पाटील,गुरव-पुजारी, मानकरी,सेवेकरी,भाविकांच्या सानिध्यात मोठ्या पोलीस फौज फाट्याच्या सुरक्षेत पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
यावर्षी सोहळ्यासाठी खास आकर्षण म्हणून ए वन युवा मंच,व ईगल फायर वर्क्स कडून ” लंका दहन “
श्री राम फायर वर्क्सचे ”झुंबर औटांचा शो,घागर डिजिटल औंटांची आतषबाजी ”शहीद भगतसिंग मंडळा कडून नीरज चोप्रा चा सुवर्ण भाला फेक,सिध्दीविनायक मंडळाकडून ”उगवता सुर्य,माईन शो,नयनरम्य औंटांची आतषबाजी,तर जमादार दारू शोभा मंडळाकडून ” आशियाई स्पर्धेत 107 पदके पटकावणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन ” नयनदीप दारू शोभा मंडळाकडून आदित्य एल -1 मिशन सूर्ययान,तसेच बैलगाडा शर्यत , बाळूमामा मंदिर दर्शन यांची नेत्रदीपक आतीषबाजी दाखविण्यात आली.फिरत्या हत्तीच्या सोंडेतून आतषबाजी तर कोरे आड्ड्याच्या सत्वशील मंडळाची फेमस लाकडी शिंगाट तर सिद्धराज चौक येथे रवींद्र गुरव यांचे कडून महाकाय धबधबा,’सिध्दराज फायर वर्क्स कडून रंगीत झाडकाम, क्रॅकर चक्र तसेच आकाशतारा मंडळाकडून अवकाश व्यापणारी चक्राची कमान,गोकाक धबधबा,अजिंक्यतारा मंडळाचे कागदी शिंगटांची फायर शो”असे नाविन्यपूर्ण प्रकार आतषबाजीतून यावर्षी दाखवण्यात आले.प्रदक्षिणा मार्गावरील ग्रामस्थ भाविकांनी दारातुन दर्शन घेतले.मार्गावर ठीक ठिकाणी रांगोळी विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती.
ग्रामप्रदक्षिणा करीत देवधरे येथे बहिणीच्या भेटीला श्रींची स्वारी पोहचल्यावर विधीवत पूजाअर्चा होऊन मानकरी यांना प्रसाद वाटप करण्यात आले.श्रींच्या स्वारीचें परत सकाळी 10.30वाजता मंदिरात आगमन झाले.त्यानंतर मंदिरामध्ये दारू शोभा मंडळ,पालखीचे मानकरी,गावकरी, सेवेकऱ्यांना देवस्थानच्या वतीने श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
यावर्षी ग्रामस्थ भक्तांनी धोकादायक आताशीबाजी न करता पालखी सोहळा सुरळीत पार पाडला.यावेळी सुरळीतपने विधीवत कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशासन पोलिस यंत्रणा प्रयत्नशील होती.पोलिसांनी गर्दी हाताळत सोहळा सुरळीतपने पार पाडला.यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, तहसीलदार रवींद्र रांजणे,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ,पोलिस अधिकारी,प्रशासकीय अधिकारी कवठे एकंद ग्रामपंचायत,सरपंच,व सेवक,तासगाव नगरपालिकाची अग्निशमक यंत्रणा,ऍम्ब्युलन्स, होमगार्ड,पोलीस कर्मचारी यांच्याकडून सोहळ्याचे चोख नियोजन करण्यात आले होते.
समस्त कवठे एकंद कर,ग्रामपंचायत,दारू शोभा मंडळ,भाविक यांनी सोहळा शांततेत पार पडल्यामुळे पोलीस,प्रशासनाचे आभार मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.