प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत भर पावसात शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा

पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी

प्रतिष्ठा न्यूज / रवि काळेबेरे 
सांगली : पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष शेतकरी सभेचे राज्य संघटक व पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला.
सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून आताच पूर्ण होत असलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ गेला आहे त्याचे काम गेली चार वर्षे झाली सुरू आहे. त्या राष्ट्रीय महामार्ग बाधीत क्षेत्राला १०० चौरस मीटरला साधारणतः ८० हजार ते १ लाखापर्यंत व त्याच्या चारपट म्हणजे गुंठा ४ लाख प्रमाणे एकरी दीड कोटी पेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे…आताही आपल्याच सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून नवीन पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे क्र. १६० जाणार असल्याचे आपण जाहीर केलेल्या. १६/९/२२ च्या पत्रानुसार समजते. आम्ही सर्व महामार्ग बाधीत शेतकरी आपणाला विनंती करतो की आपल्या जिल्ह्यातून गेलेल्या १६६ राष्ट्रीय महामार्गातील जास्तीचा जो दर असेल तो दर नवीन ग्रीनफिल्ड हायवे १६० च्या संपूर्ण बाधीत शेतकऱ्यांना द्यावा.

या पार्भूमीवर आम्ही पुढील मागण्या करीत आहोत…

१) पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाधीत शेतकऱ्यांच्या बाधीत क्षेत्राला राष्ट्रीय महामार्ग लगतचा दर धरून कमीत कमी एकरी दीड कोटी किंवा बाजारभावाच्या दहापट मोबदला द्या…
२) महामार्ग बाधीत शेतकऱ्यांची मोबदला मिळण्याची निवाडा नोटीस वहिवाटी प्रमाणे..द्या.
३) महामार्ग बाधीत प्रत्येक गावातील संपूर्ण बाधीत शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तो पर्यंत त्या गावच्या हद्दीत कसलेही महामार्गाचे काम सुरू करू नये.
४) महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या फळबागा फळझाडे. विहिरी बोअरवेल पाईपलाईन बांधकाम पत्राशेड जनावरांचा गोठा या सर्वांचे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला द्या…
५) जर महामार्ग गटाच्या मध्यातून जात असेल व दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची जमीन थोडी उरत असेल व ती त्याच्या उपयोगाची नसेल तर संपूर्ण जमीन बाधीत धरून मोबदला द्या.
६) नवीन हायवे करत असताना जिथे जिथे जिल्हा मार्ग राज्य मार्ग क्रॉस होतात तिथे ग्रीनफिल्ड हायवे वर प्रवेश करण्यासाठी तरतूद करा.

७) या ग्रीनफिल्ड हायवे मधे सुरवातीपासूनच स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार द्यावा
८) शेतकऱ्यांच्या सहमती व समाधानासाठी २०१३ च्या भूमि अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करा..

९) बाधीत शेतकऱ्यांच्या फळबागा फळझाडे बांधकाम विहिरी बोरवेल पाईपलाईन या सर्वाचा सर्वे पंचनामा करताना त्या गावातील शेतकऱ्यांना अगोदर २ दिवस सूचना करून jmc एकत्रित कमिटी यावी.

वरील सर्व मागण्यांचा विचार करूनच नीवाडा नोटीस देण्यात यावी.

जोर जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत.
या मोर्चात एस. व्ही जाधव चिटणिस मंडळ सदस्य, बाबासा करांडे, पांडूरंग जाधव, कुमार माळी, शरदराव पाटील, प्रा. बाबुराव लगारे, गुंडा जगताप, सुर्यकांत नारायण पाटील, सचिन करगणे, हणमंत सुर्यवंशी, रूपाली पाटील, सचिन सोनवणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.