प्रतिष्ठा न्यूज

माथाडी हमाली कामगारांची मजूरी व वेतन वाढवा : जालना जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन शेख नुर यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/ सुखदेव रावळकर
जालना : जालना जिल्हा व असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन शेख नुर यानी भुसार व कापुस बाजार क्षेत्राच्या मजूरीचे दर वाढवून मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना निवेदन देऊन मागणे केली की जालना बाजार क्षेत्रात भुसार व कापुस क्षेत्रातील हमाली व वजन मापाचे काम करणाय्रा कामगारांच्या वतीने विनंती करण्यात येते की दर तीन वर्षात आमच्या मजुरीत वाढ होत राहते दर वाढ होऊन तीन वर्ष पूर्ण झाले आहे मागील दरवाढीच्या तुलनेत आता महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी साहेबांनी महागाईला लक्षात घेऊन संध्या हमाल व माथाडी कामगारांना ज्या दराने मजूरी दिली जाते त्यात किमान 45 ते 50 टक्के वाढवून देण्यासाठी निवेदन दिले या निवेदनावर जालना जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन शेख नुर उपाध्यक्ष ब्रम्हानंद जांगडे सचिव शेख मुक्तार कोषाध्यक्ष रजनिकांत बडल्लु संघटक नाशेर खान सहसचिव शाम अवसरमल सदस्य शेख नजिर रफीक शेख सलीम शेख अशपाक मोहम्मद दादुवाले शेख मुकीत व ईतर असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.