प्रतिष्ठा न्यूज

तरुणांनी नोकरीच्या‎ पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु‎ करावा : वसंतराव मुळीक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : ” तरुणांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचे‎ दिवस वाया घालवू नयेत .नोकरीच्या‎ पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु‎ करावा” असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.‎ ते मंगळवार पेठ कोल्हापूर येथील  ‘हॉटेल कोकण कन्या’ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मुळीक यांनी ” छोटे व्यवसाय सुरु करून स्वतःचे मोठ्या व्यवसायात रूपांतर  करून करोडो रुपयांची उलाढाल‎ करणाऱ्या निवडक व्यवसायीकांची उदाहरणे‎ उपस्थितांना दिली.व त्यांनी हॉटेल कोकणकन्या हॉटेल कन्यांच्या मालकांना भविष्यासाठी शुभेच्छा‎ दिल्या.
यावेळी तुकाराम पडवळ, नीलम पडवळ, एकनाथ गावडे, अंजली गावडे, नंदकुमार पवार, संजय जाळींद्रे,अमर पाटील, राजन मटकर, गणेश फाटक, वैभव परब, अशोक भोसले, रत्नप्रभा भोसले, सूर्यकांत पडवळ, प्रताप जाधव, सुहास पडवळ आदी शंभर वर नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.