प्रतिष्ठा न्यूज

बांधकाम कामगारांच्या बोनससाठी १७ ऑक्टोबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर जनआक्रोश धडक मोर्चा काढणार वंचित बहुजन माथाडी युनियनचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अनेक वर्षाच्या प्रतिक्षेत बांधकाम कामगारास वर्षातून एकदा येणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटूंबाला नवीन कपडे घेणे, गोडधोड पदार्थ करणे व इतर आनंदोस्तव उत्साहाने साजरी करण्यासाठी यंदा तरी महाराष्ट्र शासनाने नोंदीत कामगारास रु. १०,०००/- दिवाळी बोनस जाहीर करुन दिवाळीच्या अगोदर प्रत्येक कामगाराच्या खात्यावर जमा करुन आर्थिक मदत १४ ऑक्टोबर पर्यंत करावी. अन्यथा १७ ऑक्टोबर रोजी
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीत घरावर जनआक्रोश धडक मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्ह्याच्या धरतीवर कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात सदर घरकुल योजना महाराष्ट्र शासनाने तात्काळ सुरु पालनपोषण बांधकाम कामगार हा जिवावर उदार होवून काम करीत असतो. कारण आपल्या कुटुंबाचे करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत असतो. त्यामुळे बांधकाम कामगारांसह कुटूंबियांना मेडिकल क्लेम योजना लागू सकारण बांधकाम कामगार व त्यांचे कुटूंबीय सुरक्षित व निरोगी राहून जीवघेण्या रोगापासून मुक्त होवून सुखरूप राहातील. सन २०१४ पर्यंत सदर मेडिकल योजना महाराष्ट्र राज्यात कामगारांसाठी सुरु होती. परंतु सदर योजना सन २१०४ नंतर बंद केलेली मेडिकल क्लेम योजना तात्काळ सुरु करण्यात यावी. करावा. जिल्ह्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त पूर्ण वेळ नाही. गेले अनेक वर्षे कोल्हापूर कामगार आयुक्त पदाच्या योग्यतेचा अधिकारी कायमस्वरुपी मिळत नाही का ? तसे असल्यास महाराष्ट्र शासनाने जिल्हयातील अनेक कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबीत असल्याचे पहायला मिळते. तरी महाराष्ट्र शासनाला सहाय्यक तसे जाहीर करून आमच्या संघटनेला सदर जबाबदारी सोपवावी. आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्त पदासाठी मुलाखत घेवून आम्ही तुमच्याकडे सदर योग्यतेचा अधिकारी सोपवू, नाही तर महाराष्ट्र शासनाने तात्काळ कोल्हापूर जिल्हयासाठी सहाय्यक कामगार आयुक्त पदी कायमस्वरूपी नेमण्यात यावा.
बांधकाम कामगार नोंदणी १८ ते ६० वर्षापर्यंत केले जाते. परंतु सदर कामगाराची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगारास कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी ५,०००/- रुपये पेन्शन सुरु करावे. पोषण करताना घरातील कुटूंबीय कामगाराकडे पहाताना बाधकाम कामगार हा आपल्या कुटूंबाचे पालन घरातील कुटूंबकर्ता व आधारवड म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. परंतु अलिकडच्या काळात अनेक बांधकाम कामगार मृत्यूमुखी पडल्याचे पहायला मिळते. सदर कुटूंबीयांना महाराष्ट्र शासनाकडून कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास २,००,०००/- रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर करुन सदर योजना सुरु केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात १८ ते ५० वर्षाची मर्यादा सांगून संबंधित कामगार कार्यालयाकडून कामगाराच्या वारसांना कोणतीही आर्थिक मदत न करता टाळाटाळ केली जाते. परंतु सदर वयोमर्यादिची अट रद्द करून सरसकट कामगारांना नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना २,००,०००/- रुपये मिळालेच पाहिजेत अशी तरतूद करावी.

तरी महाराष्ट्र शासनाला बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी कोणताही वेगळा निधी उपलब्ध करण्याची गरज नसून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सदर मंडळाकडे पडून असलेल्या कोटयावधी निधीतून कामगारांना दिवाळी बोनस जाहीर करावी. व इतर प्रमुख मागण्यांचे विचार विनिमय करावे यासाठी दि. २७/०९/२०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आमची भूमिका निवेदनाव्दारे महाराष्ट्र शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही सांगली येथील सन्माननीय पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेवून आमची भूमिका जाहीर करीत आहोत. तरी नूतन कामगार मंत्री, मा. सुरेश खाडेसाहेब यांनी आमच्या भूमिकेचा योग्य तो विचार करून बांधकाम कामगारांना दिलासा मिळेल असा निर्णय दि. १४/१०/२०२२ रोजीपर्यंत मांडतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. अन्यथा लोकशाही मार्गाने बांधकाम कामगारांचे गा-हाणे मांडण्यासाठी दि. १७/१०/२०२२ रोजी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांनी रहात असलेल्या १०० फूटी रोड सांगली येथील घरावर जनआक्रोश धडक मोर्चा काढण्यात येईल. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कामगार कार्यालयाचे प्रशासन व महाराष्ट्र शासन, सन्माननीय कामगार मंत्री जबाबदार राहातील याची नोंद घ्यावी.
यावेळी गणेश कुचेकर, समाधान बनसोडे, संजय कांबळे, लक्ष्मण सावरे, फरजाना नदाफ, भारत कोकाटे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.