प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रयत्नामुळे महावितरणचा रुफटॉप सोलर ग्राहकांना दिलासा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एकाच जागेमध्ये वाणिज्यिक आणि रहिवासी वापर असणाऱ्या ग्राहकाला, तसेच एकाच आवारामध्ये किंवा इमारतीमध्ये वेगवेगळ्या वीज जोडणी असणाऱ्या महावितरण ग्राहकाला एकाच छतावरती वेगवेगळे सोलर बसविता येणार! याबाबत परवानगी ठेवण्याबाबतचा आदेश महावितरण कोल्हापूर झोनचे मुख्य अभियंता श्री. परेश भागवत यांनी काल झालेल्या सांगली सर्कल मधील सर्व सबडिव्हीजन अधिकान्यांच्या मिटींगमध्ये दिले आहेत.

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, सांगली सहयाद्रीनगर येथील महावितरण ग्राहक श्री. मोहन शिंदे यांनी व त्यांच्या तीन मुलांनी
१) गजानन मोहन शिंदे
२) विजय मोहन शिंदे
३) अजय मोहन शिंदे यांनी एकाच इमारतीमध्ये चार वेगवेगळ्या वीज जोडणीसाठी केंद्र शासनाच्या रुफटॉप सोलर सबसिडी फेज-२ योजने अंतर्गत महावितरणच्या अधिकृत एजन्सी मार्फत अर्ज केला होता. परंतू जिल्हयात यापूर्वी अशी सोलर जोडणी झालेली नसल्यामुळे तसेच याबाबतचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे लेखी आदेश उपलब्ध नसलेमुळे संबंधित सब-डिव्हीजनच्या अधिकाऱ्यांनी हे अर्ज नामंजूर केले होते.

याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी संबंधित ग्राहकासोबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार केलेनंतर वरील आदेश तत्परतेने देण्यात आले.
यापूर्वी एकाच इमारतीमध्ये राहणाऱ्या विभक्त कुटुंब तसेच अपार्टमेंट वेगवेगळ्या वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांना छताच्या मालकी हक्कामुळे सोलर जोडणी मंजूरी देता येत नव्हती. सोबतच एकाच आवारात वाणिज्यिक आणि रहिवासी वापर असणाऱ्या ग्राहकांना फक्त वाणिज्यिक वापरावरच सोलर नेट मीटर बसविण्यासाठी परवानगी मिळत होती. दुसरे रहिवासी कनेक्शन बंद करावे लागत होते. यामुळे रहिवासी ग्राहकाला मिळणाऱ्या रुफटॉप सोलरच्या केंद्र शासनाच्या सबसिडी पासून वंचित रहावे लागत आहे हि गोष्ट शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तत्परतेने झोनच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार केल्यानंतर इमारती मधील इतर वीज ग्राहकांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन अशा ग्राहकांना सोलर जोडणी मंजूरी ठेवण्याबाबतचे आदेश श्री. भागवत यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या निर्णयामुळे महावितरणच्या रहिवासी ग्राहकांना केंद्राच्या रुफटॉप सोलर सबसिडी योजनेचा लाभ घेता येणार आहे पर्यायाने महावितरण ग्राहक वीज निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाल्यामुळे महावितरण वरील वीज मागणीचा बोजा कमी होऊन वीज बचतीस तसेच राष्ट्रनिर्मितीस हातभार लागणार आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी श्री. सारंग पवार, नरेंद्र बनसे, रोहन वाल्मिकी, संदीप ताटे, स्वप्निल म्हस्कर, अमोल संकपाळ आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.