प्रतिष्ठा न्यूज

अस्टिग्मा होप क्लिनिक इचलकरंजी शाखेचा शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : अस्टिग्मा होप क्लिनिक (वंध्यत्व निवारण केंद्र) इचलकरंजी शाखेचा आज २८ डिसेंबर, २०२३. शुभारंभ धन्वंतरी पूजनाने झाला. यानिमित्त जानेवारीमध्ये २०२४ नूतन वर्षारंभ शिबिरात तपासणी शुल्क घेण्यात येणार नाही. अस्टिग्मा होप क्लिनिकच्या शिरोळ व कोल्हापूर येथे शाखा आहेत. आजपासून के. पी. काॅम्प्लेक्स, पुर्वीचे दौंडे हाॅस्पिटल, राणी बागेजवळ, इचलकरंजी येथे नवीन शाखा सुरू होत आहे. डॉ. उमेश दत्त कळेकर हे वंध्यत्व उपचार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविख्यात नाव आहे. गेल्या काही दशकांमध्ये वंध्यत्व क्षेत्रात त्यांनी आपल्या अस्टिग्मा होप क्लिनिकच्या माध्यमातून आयुर्वेदिय उपचाराव्दारे देश-विदेशातील हजारो संततीहीन दांपत्यांना विना शस्त्रक्रिया संतती लाभ करून दिला आहे. त्यांच्या स्वतःच्या संशोधनातून निर्मित औषधांनी वंध्यत्व रूग्णांना अपत्य लाभ होत आहे. स्त्री वंध्यत्वाची कारणे – पी.सी.ओ.डी., अनियमित पाळी, ट्युबल ब्लाॅक, फायब्राॅइड, सिस्ट ही आहेत. तर पुरूष वंध्यत्वाची कारणे शुक्रजंतू कमी असणे, अजिबात नसणे, लैंगिक क्षमता कमी होणे ही आहेत. स्त्री व पुरुष वंध्यत्व दोषावर अस्टिग्मा होप क्लिनिक मध्ये आयुर्वेदीय, योग शास्त्रीय, नैसर्गिक व मानसोपचार उपचार केले जातात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.