प्रतिष्ठा न्यूज

मुख्याध्यापक- वसंत सिरसाट यांना प्रतिष्ठा फौंडेशन सांगलीचा “शिक्षणरत्न” पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड : येथील विणकर कॉलनी भागातील डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार वसंत जगदेवराव सिरसाट यांना सांगली येथील प्रतिष्ठा फौंडेशन चा राज्यस्तरीय “शिक्षणरत्न” पुरस्कार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच तासगाव जिल्हा सांगली येथे प्रदान करून गौरव करण्यात आला. तालुका तासगाव येथील ग्रीन रुबी हॉल येथे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राचार्य- डॉ. सुनीलकुमार लवटे, सांगलीचे खासदार मा. संजयकाका पाटील, प्रबोधनकार ह.भ.प. तुकारामबाबा महाराज, ज्येष्ठ साहित्यिक- मगदूम, डॉ. जयश्री (माई) पाटील, पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष- मा. प्रदीपकाका माने पाटील, ज्येष्ठ साहित्यिक- मा. बाबुरावजी गुरव, प्रा. संजय ठिगळे, विक्रांत पाटील, मुक्ता कोळेकर, शर्वरी पवार, स्वप्नगंधा बाबर, प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष- तानाजीराजे जाधव, विद्याताई जाधव यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक वसंत सिरसाट यांना राज्यस्तरीय “शिक्षकरत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांना प्रतिष्ठा फौंडेशनचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.