प्रतिष्ठा न्यूज

स्वच्छ सर्वेक्षणात तासगाव पालिका पहिल्या 10 मध्ये येईल मुख्याधिकारी पाटील… पालिकेची टीम चांगले कामं करत आहे : डीवायएसपी थोरबोले…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत तासगाव नगर परिषदेने सहभाग नोंदविला आहे.या अभियाना अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी संपूर्ण शहरांमध्ये केली जात आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे व पंचमहाभूतांचा संवर्धन हा उद्देश सोबत घेऊन शहरांमध्ये विविध कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीं सोबत नगरपरिषद द्वारा विविध जनजागृती करून उपक्रम देखील राबविण्यात येत आहे.हे अभियान संपूर्ण राज्य व देशभर राबविले जात असून या अंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचने देखील आवश्यक आहे.या अभियाना अंतर्गत तासगाव नगर परिषद आयोजित भव्य पारितोषिक वितरण समारंभ सोहळा दिनांक 6 मार्च रोजी साने गुरुजी नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी विविध स्पर्धा व सामाजिक स्वच्छता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था,बचत गट,शाळा,महाविद्यालय व इतर नागरिक यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमासाठी नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सचिन थोरबोले साहेब यांची होती.तसेच कार्यक्रमास स्वच्छतेचे ब्रँड अँबेसिडर डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर,प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.पृथ्वीराज पाटील साहेब यांची उपस्थिती होती.
तासगाव नगरपरिषद द्वारा स्वच्छ स्पर्धा यामध्ये स्वच्छ शाळा,स्वच्छ हॉस्पिटल,स्वच्छ मार्केट असोसिएशन, स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ हॉटेल इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सर्व आस्थापनांचे स्वच्छता विषयी स्वच्छ सर्वेक्षण 2024 च्या दिलेल्या घटकान्वये मूल्यांकन करण्यात आले. व अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय असे गुणांकन करून विजेते स्पर्धकांना  बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना देखील सहभागी प्रमाणपत्र व झाडाचे रोप देऊन त्यांना गौरविण्यात आले.स्वच्छता क्षेत्रामध्ये व नावीन्यपूर्ण पद्धतीने काम करणाऱ्या तासगाव शहरातील नागरिक संस्था, बचत गट,शाळा,महाविद्यालय यांचे देखील कौतुक करत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व तुळस या वनस्पतीचे रोप बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.गेल्या काही दिवसापासून नगर परिषद सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सोबत विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानाचे महत्त्व पटवून देत आहोत.त्यांच्या या सहकार्याबद्दल नगर परिषदे द्वारा सर्व शाळा महाविद्यालय यांना पर्यावरण दूत असे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले यांनी तासगाव पालिकेची संपूर्ण टीम चांगले कामं करत असल्याचे गौरवोद्गार काढले.मुख्याधिकारी श्री पृथ्वीराज पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षनात तासगाव पालिका पहिल्या 10 मध्ये येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमास तासगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारीसो पृथ्वीराज पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्वेता कुंडले, नगर अभियंता आनंद बाबू औताडे, विद्युत अभियंता प्रवीण चौगले,कर निरीक्षक धनश्री पाटील,सहाय्यक कर निरीक्षक चेतना साळुंखे,आस्थापना प्रमुख प्रियंका भोसले,लेखापाल सुयश कुलकर्णी,अंतर्गत लेखा परीक्षक शहाबाज शेख,वरिष्ठ लिपिक राजू माळी,प्रभारी आरोग्य निरीक्षक आयुब मनेर,वरिष्ठ लिपिक प्रताप घाटगे,शहर समन्वयक सुहास करळे, प्रधानमंत्री आवास योजनेचे शहर अभियंता अश्विन कोकणे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी परशुराम गायकवाड,उद्यान पर्यवेक्षक राहुल माळी,लिपिक राजू काळे,लिपिक कैलास खटावकर,लिपिक संतोष गायकवाड,लिपिक स्वप्निल औताडे,लिपिक प्रवीण धाबुगडे, लिपिक विद्या शेटे,लिपिक वैभव गेजगे,लिपिक आकाश पाटील,तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.