प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने मैदानी खेळ कार्यशाळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने दोन दिवशीय मैदानी खेळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी  सुहास व्हनमाने सांगली जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा, खजिनदार मिलिंद खिलारे तसेच प्रमुख वक्ते  राकेश सावे तांत्रिक अधिकारी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. सांगली जिल्ह्यातील ६५ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक व राष्ट्रीय खेळाडू यांनी सहभाग नोंदवला ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया कडून मैदानी खेळातील बदललेले नियम व नियमावली तसेच बदललेले क्रीडा प्रकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यशाळेच्या आयोजन हॉटेल अम्बेसिडर या ठिकाणी करण्यात आले त्याचे नियोजन सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन सचिव संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू समलिवाले व डॉ.गणेश सिंहासने, किशोर चंदुरे यांनी केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.