प्रतिष्ठा न्यूज

पी.एम.किसान.योजना शिबिरे कृषी विभागाने आयोजित करावे : भागवत देवसरकर

प्रतिष्ठा न्युज/राजू पवार
 नांदेड : हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पी एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व समस्यांचे एकाच छत्राखाली निराकरण करण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या समन्वयाने एकत्रितपणे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात निराकरण शिबिरे आयोजित करावे अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना  सन्मान निधी मिळत आहे,परंतु तालुक्यातले बरेच शेतकरी अद्यापही वंचित आहेत,शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिबिरात समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र E KYC,Land seeding,डाटा दुरुस्ती aadhar correction , Aadhar not link to bank,Ineligible cases ह्या मुख्य समस्या आहे,यामुळे हजारो शेतकरी पि एम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यापासून वंचित आहेत, ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाने १३ वा हफ्ता मिळू शकला नाही किंवा काहीच हप्ते मिळाले आता मिळत नाहीत असे सर्व शेतकरी निराकरण शिबिरे मध्ये सहभागी होऊन आवश्यक ती कागदपत्रे घेऊन सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करून घेतील यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे, महसूल विभाग व कृषि  विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हदगाव व हिमायतनगर तालुक्यात तात्काळ निराकरण शिबारे आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावं व पीएम किसान योजनेच हफ्ता मिळण्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी  जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी निवेदनात भागवत देवसरकर यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.