प्रतिष्ठा न्यूज

कामेरी येथे एक जानेवारी रोजी मातृ स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन : दि. बा. पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
इस्लामपूर दि 25 : कामेरी ता वाळवा येथील कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णू पाटील सामाजिक संस्था कामेरी यांचे वतीने एक जानेवारी रोजी मातृ स्मृती साहित्य संमेलनात आयोजित केले जाणार असल्याची माहिती कामेश्वरी साहित्य मंडळाचे अध्यक्ष दि.बा.पाटील यांनी दिली.
यावेळी प्रतिवर्षा प्रमाणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर केले असून याचे वितरण केले जाणार आहे .
तज्ञ परीक्षक समितीने प्रा .डॉ बाळासाहेब लबडे गुहागर यांचे शेवटची लावो ग्राफिया( कादंबरी )
प्रा. डॉ .कीर्ती मुळीक पुणे यांचे वर्तमान (कथासंग्रह )
प्रा. डॉ .प्रतिभा सराफ मुंबई यांचे उमलावे अतुनीच (कविता संग्रह)
प्रा .डॉ .चंद्रकांत पोतदार कोल्हापूरयांचे अक्षर लिपी (संकीर्ण)
बबन शिंदे हिंगोली यांचे जगावेगळा कीर्तनकार (बालसाहित्य)
सचिन पाटील सांगली यांचे पाय आणि वाटा (ललित )
अंकुश गाजरे पंढरपूर यांचे सारीपाट( कथासंग्रह)
आबासाहेब पाटील मंगसुळी यांचे घामाची ओल धरून (कवितासंग्रह )
प्राचार्य गोविंद कुलकर्णी कराड यांचे संकल्प सिद्धी या ग्रंथांना 2023 चे संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे.
या संमेलनासाठी कडेगाव चे प्रांतअधिकारी कवी गणेश मरकड नैरोबी केनिया येथील मराठी मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील, उद्योजक व रावण कादंबरीचे लेखक शरद तांदळे समीक्षक धनाजी घोरपडे प्राचार्य डॉ उदय जाधव प्रा डॉ अरुण घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन तीन सत्रात होणार असून दुसऱ्या सत्रात बाळासाहेब लबडे यांच्या ब्लाटेटीया व सुप्रसिद्ध कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या कुणब्याची पोरं या पुस्तकांचा प्रकाशन होणार आहे तिसऱ्या सत्रात कवी संमेलन आयोजित केले असून संमेलनाचे अध्यक्ष आनंद हरी कुलकर्णी हे असून सूत्रसंचालन कवी रवी बावडेकर हे करणार आहेत अशी माहिती माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष दि .बा .पाटील संयोजक अशोक निळकंठ रमेश खंडागळे धनाजी दाभोळे यांनी पत्रकाद्वारे दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.