प्रतिष्ठा न्यूज

सांगली शहरात एसटी स्टँड जवळ खेत्रे परिवाराकडून मोफत अन्नछत्र सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अन्न हे पूर्णब्रह्म हे ब्रीद वाक्य मानून खेत्रे परिवाराकडून १ फेब्रुवारी २०२३ पासून कायमस्वरूपी अन्नछत्राचे नियोजन केले आहे या अन्नछत्राला सकाळी व संध्याकाळी अश्या दोन्ही वेळेला तीनशे लोकांची जेवणाची सोय केली आहे येणाऱ्या काळात ही संख्या 500
पर्यंत करण्याचे नियोजन आहे.

या अन्नछत्रासाठी शासनाकडून मध्यान भोजन व हिंदवी फाउंडेशनचे संस्थापक अभिजीत कोळी 7 अवेन्यू फॅमिली मार्ट चे मालक धनंजय वाघ , ओंकार नागरी पतसंस्थेचे चेअरमन विनायक खेत्रे, ओंकार चिक्ले, विजय कोळेकर, या उपक्रमाला सर्वांनी सर्वपरीची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

लॉकडाऊन पासून या कल्पनेची सुरुवात झाली . त्यावेळेस खेत्रे परिवार आणि समस्त मित्र परिवारा मधील महिला वर्गांचा सुद्धा यामध्ये जास्तीत जास्त सहभाग होता . माझे आई वडील राजाभाऊ खेत्रे आणि नंदा खेत्रे यांच्या आशीर्वादामुळे हे अन्नक्षेत्राचं स्वप्न पूर्ण होत आहे.ही सर्व माहिती अन्नछत्राचे चालक विजय राजाभाऊ खेत्रे यांनी समस्त पत्रकारांना माहिती दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.