प्रतिष्ठा न्यूज

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती राजर्षी शाहू ज्युनियर काॅलेज मध्ये उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.23 : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची132 वी जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी  आणि दिनांक 22 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती राजर्षी शाहू विद्यालय,ज्युनियर काॅलेजमध्ये वसंत नगर नांदेड येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आणि महात्मा बसवेश्वर यांच्या  प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री बी. एम. हंगरगे  यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांनी या महामानवाच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. या दोन्ही महामानवांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .
       यावेळी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक डॉ. पांडुरंग यमलवाड,पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत प्रा. श्री आर .डी .देशमुख प्रा. डॉ. तुकाराम जाधव ,प्रा. एस. एस. तिवडे,आनंद मोरे,श्री बालाजी कदम, राजेश कदम,शिवानंद टापरे, अमोल भंगाळे, एन .पी. केंद्रे, डॉ. एम. एम. गाडेकर,वसंत भोसले,विठ्ठल पोकलेवाड, टी.एन .रामनबैनवाड तसेच श्रीमती एन. एस .खुळे ,एस. पी. पोहरे ,ए .वाय. देगलूरकर ,एस. एस. बायस,श्रीमती एन.एम.लोलम, एस .एस रामोड , श्रीमती एल. एच .वानोळे, श्रीमती कांता जायेभाये ( मुंडे), श्रीमती एम.एच.घोडेकर श्रीमती एल. एम .जाधव श्रीमती गिरी, श्रीमती गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मु.अ.श्री बी.डी.देशमुख,श्री सुर्यकांत टापरे,श्री अशोक गळेगावे, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री वैजनाथ आर्दड,   श्री रमेश महालिंगे,श्री वाघमारे,श्री धनाजी बस्वदे आदि   कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.