प्रतिष्ठा न्यूज

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या सांगली जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी श्री प्रमोद सातपुते यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ऑल इंडिया धनगर महासंघाच्या सांगली जिल्हा युवक अध्यक्षपदी माननीय श्री प्रमोद सातपुते (तुरची) यांची एक मताने निवड झाली आहे.याबद्दलचें निवडीचे पत्र ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रवीण काकडे साहेब यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना मा.प्रवीण काकडे साहेब म्हणाले आज महाराष्ट्रात सुमारे दोन कोटी लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजामध्ये काही ठराविक शिक्षित, पांढरपेशी वर्ग सोडला तर समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणात अशिक्षित वर्ग असून शिक्षण कमी असल्यामुळे समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत,समाज आजही मागासलेल्या स्थितीत असून जर आपणाला आपल्या स्वतःबरोबरच समाजाचे उन्नती करून घ्यायची असेल तर समाजामध्ये एकी करून, समाज एकसंघ करणे गरजेचे आहे.समाजामध्ये तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण घेऊन,उच्च पदावरील शासकीय अधिकारी,निर्णय प्रक्रियेतील लोकप्रतिनिधी अधिकच्या संख्येने तयार होणे गरजेचे आहे.
आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज असूनही समाजामध्ये एकी नसल्यामुळे,समाज एक संघ नसल्यामुळे,आपल्या समाजाची कोणताच राजकीय पक्ष दखल घेत नाही. आज समाजामध्ये धनगर आरक्षणाचा प्रस्थापित राज्यकर्त्यांनी,राजकीय पक्षांनी बेरजेच्या राजकारणासाठी वापर केला.समाजाच्या मताच्या जोरावर सत्ता स्थापन केल्यानंतर,सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले,सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या समाजामध्ये कधीच एकी होऊन दिली नाही.त्याचाच परिणाम म्हणून आज देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली असे आपण अभिमानाने सांगतो.पण दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग राधानगरी,गगनबावडा या परिसरामध्ये असणारे धनगर वाडे, वस्त्या त्याच्यावरती साधं माणसांना जाणं-येणं ही मुश्किल होतं, दळणवळणाच्या कोणत्याच सुविधा नाहीत,रस्ते नाहीत,शैक्षणिक सुविधा नाहीत,आरोग्य केंद्र नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत,आजही काही धनगर वाड्यावरती जाणे येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे धनगर समाजातील कितीतरी माता-भगिनींचे प्रस्तुती काळातील उपचारा भावी, उपचारासाठी वेळेत न पोचल्यामुळे रस्त्यामध्येच प्राण गेलेले आहे.त्याचप्रमाणे समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून सुशिक्षित तरुणांना नोकर्‍या नाहीत,उद्योगधंदे नाहीत या सह समाजामध्ये अनेक ज्वलंत प्रश्न असून याच्यावरती जर आपणास उपाय काढायचा असेल, प्रश्न निकालात काढायचे असतील तर समाज एक संघ होणं काळाची गरज आहे.यावेळी बोलताना वासुंबेचे माजी सरपंच माननीय बाळासाहेब एडके नाना म्हणाले समाजातील शेवटच्या घटकाची सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक,उन्नती,विकास होईल त्याच वेळी समाजाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल.
यावेळी विकास मस्के सर म्हणाले समाजामध्ये धनगर आरक्षणाबरोबरच,समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, समाजातील मुला मुलींचे उच्च शिक्षणामध्ये सवलती मिळाले पाहिजेत,कोल्हापूर जिल्ह्यातील काही धनगर वाड्यात मधील भौतिक सुविधेचा प्रश्न असून या प्रमुख प्रश्नासह सह समाजाच्या अनेक मागण्या असून शासन दरबारी त्या मान्य करायच्या असतील तर सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
आजच्या या कार्यक्रमासाठी प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य संतोष एडके यांनी केले.या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे साहेब,मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद ताटे,सांगली जिल्हाध्यक्ष पांडुरंग बंडगर,पोलीस पाटील संदीप वगरे, वासुंबेचे लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील,वंजारवाडी चे सरपंच अरुण खरमाटे,तुरचीचे संदीप पाटील, यांच्यासह वासुंबे,तुरची,पेड येथील सामाजिक कार्यकर्ते,माता-भगिनी, ग्रामस्थ उपस्थित होते.सर्वांनीच प्रमोद सातपुते यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.