प्रतिष्ठा न्यूज

महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्योतीताई आणि मी नेहमीच उपलब्ध असेन : डॉ. सौ शिवानी प्रभाकर पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॉक्सर ग्रुप मित्रपरिवार व स्वामिनी वुमेन्स  फाउंडेशन यांच्या वतीने जल्लोष 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातील प्रलंबित रस्त्यांसाठी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 32 कोटी 27 लाख 19 हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध करून घेतला आहे,तसेच तासगाव शहरातील बायपास रस्त्यासाठी 85 कोटी इतका निधी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय बजेट मधून उपलब्ध झाला असून डॉ शिवानी पाटील यांनी मा. खासदारांचे कौतुक केले.तसेच खासदार संजय काका पाटील हे नेहमीच महिलांचा आदर करणारे नेतृत्व असून महिलांच्या प्रश्नासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात.इथून पुढच्या काळात ही महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर मा. सौ ज्योतीताई पाटील व मी नेहमीच उपलब्ध असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.जागतिक महिला दिनानिमित्त बॉक्सर ग्रुप मित्र परिवार व स्वामिनी वुमन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित जल्लोष 2023 या कार्यक्रमात डॉक्टर सौ शिवानी प्रभाकर बाबा पाटील बोलत होत्या.  यावेळी त्या म्हणाल्या की बॉक्सर ग्रुप व स्वामिनी फाउंडेशन यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे,यांच्या वतीने महिलांना नेहमी व्यासपीठ दिले जाते.खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून सौ.दिपालीताई पाटील यांनी प्रभागाचा कायापालट केला आहे.गौरी गणपती स्पर्धा,वॉटर एटीएम,व जिमच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या,तसेच महिला सर्व क्षेत्रात काम करतात या महिलांसाठी व्यासपीठ दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका,खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ सौ शिवानी प्रभाकर बाबा पाटील यांच्या हस्ते स्वामिनी महिला पतसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले.या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मा.उपनगराध्यक्षा दिपालीताई पाटील,प्रतिभा पाटील,प्रियांका पाटील,जिल्हा दक्षता समिती सदस्य सरिता शिवणकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.