प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे लोककलावंत लक्ष्मण तात्या कांबळे यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सामाजिक कार्यकर्ते तास हिरा फॉउंडेशनचें अध्यक्ष प्रकाश कांबळे यांचे वडील लक्ष्मण तात्या कांबळे यांनी जवळपास सत्तर वर्षे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली पारंपरिक लोककला सादर करून ती जिवन्त ठेवण्याचे कामं केले आहे.त्याबद्दल गांधले पब्लिक स्कुल कवठे एकंद या विद्यालयात लक्ष्मण तात्यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्वीच्या काळी कर्नाटकातून आलेल्या तात्यांच्या कुटुंबाला तासगाव येथील श्री गणपती मंदिरात सनई चौघडे वाजवण्या साठी मान मिळाला,आणि परंपरेने तात्यांनी आपली लोककला जपत गेली सत्तर वर्ष जपून ठेवली आहे.तात्यानी आतापर्यंत परशुराम भाऊ माळी यांच्या सर्कशी सह राज्यातील अनेक सर्कशीत वाद्य वाजवून श्रोत्याचीं मन जिंकली आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात तात्यांची सनई फेमस आहे.अवघी चौथी शिकलेले तात्या अनेक वाद्यात पारंगत आहेत.विविध लेजीम पथक,अनेक मराठी चित्रपट, आकाशवाणी आदी ठिकाणी सनई वाजवण्याचे भाग्य तात्यांना लाभले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.