प्रतिष्ठा न्यूज

तासगावात तीन सप्टेंबर निमित्त काँग्रेस भवन मध्ये झेंडा वंदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव येथील ऐतिहासिक तीन सप्टेंबर 1942 च्या स्मृती दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे आज यावेळी क्रांती चळवळीत प्रत्यक्ष सहभागी असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने वय 99 यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आवर्जून उपस्थित होते. त्याच्याबरोबर तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील उपस्थित होते.तासगाव तालुका काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीरांना अभिवादन अभिवादन करण्यात आले.स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधींनी चले जावं चा नारा दिल्यानंतर  संपूर्ण भारतात पहिल्यांदा तासगाव कचेरी वरील इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून त्याठिकाणी भारताचा तिरंगा झेंडा क्रांतिकारकानीं लावला,ब्रिटिश मामलेदारला गांधी टोपी घालून झेंड्याला अभिवादन करावे लागले या ऐतिहासिक घटनेला आज 80 वर्षे पूर्ण झाली.आजच्या पिढीने त्यावेळी क्रांती कारकांनी केलेला त्याग,समर्पण विसरू नये यासाठी स्मृती दिन म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे रवींद्र साळुंखे, विकास धनवडे,बाबुराव माळी,दस्तगीर ढालाईत,शरद शेळके उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.