प्रतिष्ठा न्यूज

तासगाव नगरपालिकेला शहरात पडलेला कचरा,तुंबलेल्या गटारी दाखवायला लागतात हे दुर्दैव : मनसे नेते अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील तुंबलेल्या गटारी, ठीक ठिकाणी साचलेला कचरा नगर पालिकेला दाखवावा लागतोय आणि त्यानंतर तो स्वच्छ केला जातोय हे दुर्दैव असून अशीच परस्थिती राहिली तर गावातील दिसेल तो कचरा नगरपालिकेत आणून टाकण्याचा इशारा मनसेच्या अमोल काळे यांनी दिला आहे.तासगाव शहर अस्वच्छ असल्याबाबत मनसेच्या अमोल काळे यांनी निवेदन दिले होते.गेली दोन महिने निवेदन, फोटो, व्हिडीओ देऊन स्वच्छता करण्याबाबत तें पाठपुरावा करत आहेत. तासगांव नगरपरिषदेने नेमून दिलेल्या स्वच्छता ठेकेदाराने तासगाव शहरातील स्वच्छतेचें तीनतेरा वाजवले आहेत,तासगांव शहरातील काही प्रमुख ठिकाणाच्या रस्त्यांची स्वच्छता केली जाते उर्वरीत शहरातील बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे.नगरपरिषदेने घालून दिलेल्या नियमाच पालन करणे गरजेचे असतानाही कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही.
याबाबत ठेकेदाराला समज देऊन शहर स्वच्छ करण्याबद्दल मनसे नेते अमोल काळे यांनी तासगाव नगरपरिषदेला दोन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते.नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्ते,गल्या,बोळ,सर्व खुल्या जागा,नगरपरिषदेच्या सर्व इमारती, कार्यालय, व्यापारी संकुल शॉपिंग सेंटर शहर हद्दीतील सगळ्या कॉलन्या इ.ठिकाणची साफसफाई करणे बंधनकारक असून देखील या गोष्टी होताना दिसून येत नाहीत.
नगरपरिषदेकडून वर्षाला कोठयावधी रूपये या ठेकेदारास दिले जातात.तरीही तासगांव करांना अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे.तरी या विषयात स्वतः प्रशासनाने लक्ष देवून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केल्याचे दिसत न्हवते, यासाठी मनसे नेते अमोल काळे यांनी नगर परिषद प्रशासनास पुन्हा
एकदा निवेदन देऊन ठेकेदारावर काय कारवाई केली याबाबत विचारणा केली होती,याबाबत प्रशासनाने ठेकेदार करत असलेल्या कामाची माहिती देऊन ठेकेदार कामं व्यवस्थित करत असल्याचे म्हंटले आहे.परंतु तरीही शहराबाहेरील अनेक कॉलन्या ह्या अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे.अनेक गटारी तुंबलेल्या दिसत असल्याने याबाबत काळे यांच्या कडून त्या स्वच्छ करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.प्रत्येक वेळी कचऱ्याचें फोटो,तुंबलेल्या गटारीचे व्हिडीओ पाठवावे लागतात आणि त्यानंतर स्वच्छता ठेकेदार जागा होऊन स्वच्छता करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे इथून पुढच्या काळात कुठे कचरा आढळून आल्यास तो थेट नगरपालिकेत टाकण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने अमोल काळे यांनी दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.