प्रतिष्ठा न्यूज

मांजर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जागतिक महीला दिनानिमित्त ग्रामपंचायत मांजर्डे यांच्या वतीने खेळ पैठणीचा व पाक कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.युवा नेते रोहित पाटील,सौ.शितलताई अमोल बाबर,मा.मोहन नाना पाटील,सौ.अनिता ताई पाटील,
सौ.नलीनी काकी पवार,कु.योगिता ताई कुंभार,सरपंच सौं संध्याराणी लक्ष्मण मंडले,सौ.धनश्रीनानी मोहन पाटील,मा दत्तात्रय भाऊ हावळे,करण  पवार,सौ.संगीता ताई कोकाटे, सौ.सोनाली ताई पाटील,मा अर्जुन अण्णा खरमाटे सर्व ग्रामपंचायत सदस्या सदस्य उपस्थित यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ.संध्याराणी लक्ष्मण मंडले व सौ.धनश्रीनानी मोहन नाना पाटील व गावातील बचत गट यांनी केले होते.यावेळी गावातील माता भगीनींनी खेळ पैठणीचा कार्यक्रमात भाग घेवुन शोभा वाढवली.स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना पैठणी साड्या बक्षीस  देण्यात आल्या.पाक कला स्पर्धेस महीलांनी वेगवेगळे पदार्थ बनवुन बक्षीस जिंकली.यावेळी गावातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.