प्रतिष्ठा न्यूज

डॉ. विनायक होनमोरे लिखित लाईफ सॅटिस्फॅक्शन या पुस्तकाच्या प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : मानवी जीवनामध्ये अमुलाग्र बदल, प्रगती होत असताना देखील आपल्या सभोवतालची काहीच माणसे ही जीवनाबद्दल समाधानी असल्याचे दिसते. व्यक्ती समाधानी असेल तर सामाजिक स्वास्थ्यामध्ये देखील वृद्धी होते. धनात्मक स्व: आदर, आशावाद, प्रयत्नवादी असणं, परिस्थितीचा स्वीकार करण यातूनच आपण समाधानी आयुष्य जगू शकतो असे प्रतिपादन डॉ. विनायक होनमोरे लिखित लाईफ सॅटिस्फॅक्शन या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. एम. जी. जाधव यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते पुढे म्हणाले की, सदर पुस्तक हे संशोधनाचा उत्तम नमुना असून एचआयव्ही बाधित रुग्ण, त्यांच्याकरिता काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि एकूणच समाजाला, सर्वांना मार्गदर्शक ठरेल.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रोफेसर डॉ. भरत नाईक म्हणाले की जीवन हा एक प्रवास आहे तो सुखा समाधानाचा व्हावा यासाठी काय करता येईल याचा शोध घेणारे हे पुस्तक आहे. समाधानाची संकल्पना स्पष्ट करणारे आणि हे वाढवण्यासाठी यामागील घटक शोधणारे हे पुस्तक संशोधन आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल.
आजच्या भौतिक सुखाच्या चढाओढीत आपण समाधान हरवून बसलो आहे. समाधानी रहाण्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचे कोणते घटक महत्त्वाचे आहेत हे शोधून मानवी जीवन समाधानी करण्याचा या पुस्तकाचा उद्देश अत्यंत कौतुकास्पद आहे असे विचार शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विकास मिणचेकर यांनी मांडले.
सांगली नगरीतील ख्यातनाम उद्योजिका आदरणीय सुमैयाजी नदाफ आणि उद्योजक इस्माईलजी नदाफ यांच्या शुभहस्ते डॉ. विनायक होनमोरे यांच्या लाइफ सॅटिस्फॅक्शन या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. याप्रसंगी एसएससी बोर्ड कोल्हापूरचे सचिव मा. श्री. दत्तात्रय पोवार, एचपीसीएल माझगावचे वरिष्ठ व्यवस्थापक मा. श्री. संजय शिंदे, न्यू इंडिया इन्शुरन्स चे सेवानिवृत्त सिनीयर डिव्हिजनल मॅनेजर मा. श्री. प्रकाश होनमोरे, श्रीमती म. ग. कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. आर. जी. कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात डॉक्टर श्रीधर वाघ, डॉक्टर पंकज पोवार, डॉक्टर विकास रोकडे, साहित्य क्षेत्रातील डॉ. सुरज चौगुले, डॉ. नंदिनी काळे, डॉ. संदीप दळवी, फास्टा संघटनेचे पदाधिकारी यासह शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. प्रिया होनमोरे, सौ वर्षा शिंदे, प्रा. अलिया नदाफ, डॉ. नंदिनी काळे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत शौर्य होनमोरे यांनी केले तर ओळख आणि प्रास्ताविक डॉ. विनायक होनमोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कुमारी रितु होनमोरे हिने मानले. सूत्रसंचालन सौ शामल होनमोरे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.