प्रतिष्ठा न्यूज

जगातील सुपरफास्ट अँजिओग्राफी चे श्रेय डॉ. रियाज मुजावर यांनाच

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : रविवार, 14 ऑगस्ट 2022. सकाळी त्यांच्या छातीतून वेदनेची असह्य कळ आली. पाटील यांचे पेशाने डॉक्टर असलेले चिरंजीव हे एम.डी. मेडिसीनच्या अभ्यासक्रमासाठी सेलमला होते. सुनबाई त्याही डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे दुखणे अचूक ओळखले आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांना फोन केला. मुजावर यांनी युद्धपातळीवर हालचाल केली. डॉक्टरांना फोन ते भारती हॉस्पिटलमध्ये दाखल व अँजिओप्लास्टी हे सारे अवघ्या 43 मिनिटात झाले. कदाचित जगातील ही सुपरफास्ट अँजिओग्राफी ठरावी.
त्यांच्या हृदयाची डाव्या बाजुची मुख्य धमनी शंभर टक्के आणि डाव्या बाजुची 90 टक्के ब्लॉक झाली होती. त्यामुळे हृदयाकडून रक्ताचे होणारे पंंपिंग 35 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. . प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी अचूक निदान करत गतीने हालचाल केली. हॉस्पिटलच्या गेटवर जात स्वत: रुग्णाला उचलून स्ट्रेचरवर ठेवले. लिफ्टही सज्ज ठेवली होती. ऑपरेशन थिएटरमध्येही सर्व व्यवस्था करून ठेवली होती. रुग्णाची तातडीने अँजिओग्राफी केली आणि अँजिओप्लास्टीचा निर्णयही लगेचच घेतला. रुग्णांच्या सुनेचा डॉक्टरांना फोन ते अँजिओप्लास्टी हा कालवधी अवघे 43 मिनिटे होता. कदाचित जगातील ही सुपरफास्ट अँजिओप्लास्टी असेल. डॉ. मुजावर यांची तत्परता, अचुक निदान व कुशलता यामुळे रुग्णाचे प्राण वाचले. गणपतराव पाटील शनिवारी (27 ऑगस्ट) डॉ. मुजावर यांच्या ‘आर्यन हर्टकेअर’मध्ये आले होते. अगदी खडखडीत होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.