प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील कॉन्ट्रॅक्टर माणिक पाटील यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक : पैशाच्या हव्यासापोटी केला खून

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील कॉन्ट्रॅक्टर माणिक पाटील यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, १) किरण लखन रणदिवे वय २६ रा, कृष्णनगर, कारंदवाडी ता वाळवा जि सांगली २) अनिकेत ऊर्फ निलेश श्रेणीक दुधारकर वय २२ रा. कारंदवाडी ता वाळवा जि सांगली ३) अभिजीत चंद्रकांत कणसे वय २० कृष्णनगर, कारंदवाडी ता वाळवा जि सांगली.
याबाबत माहिती अशी,
दिनांक १३ ऑगस्ट रोजी रात्री ०८.३० वा ते ०८.४५ वा कंत्राटदार माणिकराव विठ्ठल पाटील यांना तुंग येथील मिणचे मळा ते तुंग जाणारे रोडवरील भारत बेझ शोरुम समोरील प्लॉट दाखवण्याचा आहे सांगुन तेथे बोलावुन घेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर दिनांक १७.८.२०२२ रोजी कवठेपिरान गावचे हद्दीत दुधगाव ते समडोळी वाहणा-या वारणा नदीच्या पात्रात पांडुरंग पाटील यांचे शेती लगत असले वारणा नदीच्या पात्रात यातील मयत नामे माणिकराव विठ्ठल पाटील यांचे प्रेत मिळुन आले होते. त्याचे दोन्ही हात पाठीमागे काळया रस्सीने बांधण्यात आले होते, याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अपहरण करुन खुन करुन पुरावा नष्ट केले बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील अपहरण करुन झाले खुनाच्या गुन्हयांबाबत मा. पोलीस अधिक्षक दिक्षीत गेंडाम, मा. अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांनी गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, भगवान पालवे, विशाल रेळेकर, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे यांचे पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे वरील सर्व पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालु केला, सदर गुन्हा करताना आरोपी यांनी पुरावा नाहीसा केल्याचा प्रयत्न केल्याने व गुन्हयाचे प्रत्यक्ष ठिकाण हे निर्जन स्थळ असलेने तपास करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. सदर गुन्हयाचे अनुषंगाने सर्व तांत्रीक तपास चालु होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तुंग, कारंदवाडी, सांगलीवाडी, कवठेपिरान या भागातील अभिलेखावरील सर्व आरोपींची माहीती घेतली व गोपनीय बातमीदार तयार करण्यात आले. त्याप्रमाणे सपोनि प्रशांत निशानदार व त्यांचे पथकास खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा कारंदवाडी गावातील किरण रणदिवे, अनिकेत दुधारकर, अभिजीत कणसे यांनी केला आहे. सदरचे संशयीत इसम हे कारंदवाडी गावात सांगलीकडे जाणारे बस स्टॉप जपळ थांबले असल बत माहिती मिळाली, मिळाले माहिती प्रमाणे सपोनि प्रशांत निशानदार व त्यांचे पथकाने कारंदवाडी गावात सांगलीकडे जाणारे बस स्टॉप जवळुन त्या तीन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे १) किरण लखन रणदिवे वय-२६ रा, कृष्णनगर कारंदवाडी ता. वाळवा जि. सांगली
२) अनिकेत ऊर्फ निलेश श्रेणीक दुधारकर वय २२ रा जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ कारंदवाडी ता वाळवा जि सांगली
३) अभिजीत चंद्रकांत कणसे वय २० कृष्णनगर कारंदवाडी ता वाळवा जि सांगली अशी सांगितली, त्यांचेकडे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील अपहरण केले खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, किरण रणदिवे यांनी सागितले की, त्या तिघांना पैशाची गरज होती, किरण रणदिवे याने लोकांकडुन हात ऊसनवार करुन पैसे उचलेले होते, ते लोक यांरवार पैसे मागण्या करीता त्याचे घरी येऊन पैसे परत मागण्याचा तगादा लावत होते, त्यांना पैसे परत करण्यास जवळ पैसे नव्हते. त्यामुळे किरण रणदिवे व अभिजीत कणसे, अनिकेत ऊर्फ निलेश दुधारकर असे तिघांनी मिळुन कोणाला तरी अपहरण करुन त्यांचेकडुन पैसे मागण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे किरण रणदिवे याने कॉन्ट्रक्टर माणिक पाटील यांची माहिती काढली की, हा इसम विश्रांती नाष्टा सेंटर तुंग या ठिकाणी रोज ये जा करतो त्याचे कडे भरपुर पैसे आहेत, त्याचे अपहरण करुन पैसे मागणेबाबत आरोपींनी ठरविले. त्याप्रमाणे निलेश दुधारकर याने एका चोरीच्या मोबईल वरुन माणिक पाटील यांना संपर्क करुन त्यांना तुंग येथील मिणचे मळा ते तुंग जाणारे रोडवरील भारत बेंझ शोरुम समोरील प्लॉट दाखवण्याचा आहे असे सांगुन तेथे बोलावुन घेतले. माणिक पाटील सदर ठिकाणी आल्यावर त्यांना सर्व आरोपींनी मिळून पकडले असता आरोपी व मयत यांचेमध्ये झटापट झाली व त्या झटापटीमध्ये मयत माणीक पाटील हे खाली पडले. शनिवार असलेने तुंग गावी ग्रामदैवत मारुतीचे दर्शनास येणारे काही लोक ये जा करीत असल्याने माणिक पाटील यास पकडले नंतर आरडा ओरडा करेल म्हणून किरण रणदिवे व अभिजीत कणसे, अनिकेत ऊर्फ निलेश दुधारकर यांनी माणिक पाटील यांचे तोंड व हातपाय दाबुन धरले. त्यांमध्ये माणिक पाटील हे बेशुध्द झाले. त्यावेळी वरिल तिघांनी काळ्या रस्सीने माणिक पाटील यांचे हात बांधुन त्यांचेच स्कोडा गाडीचे डिकी मध्ये त्यांना घालुन तुंग मार्गे कवठेपिरानचे आडमार्गी रोडला गाडी थांबवुन गाडीची डिकी उघडुन माणिक पाटील यांना परत पाहिले असता, त्यांची काही हालचाल जाणवेना त्यामुळे ते मयत झाले असावेत म्हणून आरोपींनी ती गाडी कवठेपिरान, दुधगाव मार्गे घेऊन कुंभोज ब्रिज वरुन माणिक पाटील यांना वारणा नदीच्या पात्रात टाकले व त्यांची स्कोडा गाडी कोडीग्रे फाटा, इचंलकरजी रोड या ठिकाणी रस्त्याचे कडेला लावून ते तिघे हातकणंगले, शिगांव, आष्टा मार्गे कारंदवाडी गावी परत आले असुन सदरचा गुन्हा हा त्यांनीच पैशासाठी केला असल्याचे कबुल केले आहे.
त्या तिघांना पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडे आरोपी वर्ग करण्यात येत आहे. पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.
या प्रकरणात विशेष कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी असे
सपोनि प्रशांत निशानदार, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, संदीप नलवडे, बिरोबा नरळे, सागर टिगरे, अनिल कोळेकर, चेतन महाजन

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी

मा.पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोनि सतिश शिदे (स्था.गु.अ.शाखा) २) पोनि शिवाजीराव गायकवाड (सांगली ग्रामीण) ३) सपोनि प्रशांत निशानदार ४) सपोनि भगवान पालवे ५) सपोनि अमितकुमार पाटील (विश्रामबाग) ६) पोफी विशाल येळेकर, ७) पोफी महंमद शेख ८) पोफी सागर पाटील (सां.ग्रा.) ९) पोफी रोहीदास पवार (सायबर),
अच्युंत सुर्यवशी, संदीप गुरव, दिपक गायकवाड, सुनिल चौधरी, अरुण औताडे, मेघराज रुपनर, सुधीर गोरे, निलेश कदम, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, राजु शिरोळकर, मच्छिद्र बर्डे, राजू मुळे, संकेत मगदुम, अनिल कोळेकर, हेमत ओमासे, चेतन महाजन, संदीप नलवडे, वैभव पाटील, नागेश खरात, सचिन धोत्रे, कुबेर खोत, सुनिल लोखंडे, संदीप पाटील, विकास भोसले, शशिकांत जाधव, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, सचिन कणप, रुषीकेश सदामते, संकेत कानडे, सुनिल जाधव, विनायक सुतार, उदय माळी, संतोष गळवे, विक्रम खोत, सोहेल कार्तीयानी, रुतुराज होळकर, अजय बेद्रे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकोडे,सुनिल मदने (सायबर पोलीस ठाणे) सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील पथक, विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पथक

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.