प्रतिष्ठा न्यूज

प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारा ट्रक व आरोपी जेरबंद ७३ लाख ६० हजार ८२०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारा ट्रक व आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ७३ लाख ६० हजार ८२०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाईने ही कारवाई केली. याप्रकरणी रवि अर्जुन होळकर, वय ३४ वर्षे, रा. कासरुडी यवत, ता. दौंड, जि. पुणे. या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या लोकांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २६/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांचे पथक शासकीय वाहनाने अंकलगी ते उटगी रोडने पेट्रोलिंग करीत असताना, मालवाहु ट्रक क्र. KA 29A 2588 भरधाव वेगाने निघून गेला. सदर बाहनाचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबवून चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याचे नाव रवि अर्जुन होळकर, रा. कासरुडी यवत, ता. दौंड, जि. पुणे असे असलेचे सांगितले. नमुद वाहन चालकांस त्याचे कडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का? तसेच त्याचे वाहनांमध्ये कोणता माल भरला आहे? तसेच त्याची बिल पावती आहे काय याचाबत त्याचेकडे विचारणा केली. तसेच त्याचे तायेत असलेल्या वाहना मध्ये कोणता माल भरला आहे त्याबाबत रवि होळकर यास विचारण केली असता तो काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.

त्याचा संशय आल्याने सदरचा मालवाहु ट्रक उमदी पोलीस ठाणेस घेवून जावून पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष रवि होळकर याचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये वरील वर्णनाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधी तंबाखु व गुटखा मुद्देमाल मिळुन आला. त्याचाचत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदर गाडी मध्ये सुगंधी असलेला पान मसाला व गुटखा मुद्देमाल हा मॉन्टी ऊर्फ दर्शन तुरेकर रा. हडपसर पुणे यांचे सांगणेवरून विजापुर येथून आणला असल्याची कबुली दिली.

लागलीच सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटख्याचे रासायनिक तपासणीसाठी सॅम्पल घेऊन पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर उमदी पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे.

*जप्त मुद्देमाल*
२,४९,६००/- रु. किंमतीचे एक सुतळी बारदान मध्ये ०४ पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यामध्ये केशरयुक्त विमल पान मसाला लिहीलेले लाल रंगाचे प्लॅस्टिकचे ५२ पाकीट व प्रत्येक पाकीटात ३० पुडया अशा एकुण ६२४० पुड्या प्रति पुडी ४ रु. दराने प्रती बारदान किंरु. २४९६/- प्रमाणे १० बारदानाची कि. रुपये.
१,७१,६००/- रु किमतीचे एक सुतळी बारदान मध्ये ०५ पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यामध्ये ०४ पांढऱ्या रंगाची लहान पोती, पत्येक लहान पोत्यात वि-१ तंबाखु लिहीलेले निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे ५२ पाकीट व प्रत्येक पाकीटात २२ पुडया अशा एकुण २२,८८० पुड्या प्रति पुडी १.५ रु. दराने प्रती बारदान किं. रु. ३४,३२०/- प्रमाणे ०५ बारदानाची कि. रुपये.

१००.२५०/- रु. किमतीचे एक परयाच्या बॉक्समध्ये ०५ पांढऱ्या रंगाची पोती प्रत्येक पोत्यामध्ये केशरयुक्त विमल पान मसाला लिहीलेले लाल रंगाचे २० कागदी चॉक्स व प्रत्येक बॉक्स १० पुड्या तसेच १० प्लॅस्टिकचे पाकीटात ३० पुडया अशा एकूण ११५० पुड्या प्रति पुडी ४७१.५ रु. दराने प्रति बॉक्स किं. रु. ५४०५०/- प्रमाणे ०५ पुड्याचे बॉयस कि. रुपये.

४. १७,२५०/-

रूपये एका पुठठ्याच्या बॉक्समध्ये ०५ पांढ-या रंगाची पोती, प्रत्येक पोत्यामध्ये वि- १-चिग असे लिहीलेले लाल रंगाचे २० बॉक्स व प्रत्येक बॉक्स मध्ये १० पुडया तसेच १० प्लॅस्टिकचे पाकीटात ३० पुडया अशा एकुण ११५० पुडया प्रति पुडी ३ रूपये दराने प्रती बॉक्स किंरू ३४५०/- प्रमाणे एकुण ०५ पुठठयाचे बॉक्स किं. रू

४,८४,०००/- रूपये एका सुतळी बारदान मध्ये ०५ पांढ-या रंगाची पोती, प्रत्येक पोत्यामध्ये १० पांढ-या रंगाची लहान पोती, प्रत्येक लहान पोत्यात वि-१-तंबाखु असे लिहीलेले हिरव्या रंगाचे प्लॅस्टिकचे २२ पाकीट व प्रत्येक पाकीटात ११ पुडया अशा एकुण १२१०० पुडया, प्रति पुडी २ रूपये दराने प्रती बारदान किं, रु. २४२००/- प्रमाणे एकुण २० बारदानाची किं. रू.

३१,२००/- रूपये एका सुतळी बारदान मध्ये ०५ पांढ-या रंगाची पोती, प्रत्येक पोत्यामध्ये ०४ पांढ-या रंगाची लहान पोती, प्रत्येक लहान पोत्यात वि-१-तंबाखु असे लिहीलेले लाल रंगाचे प्लॅस्टिकचे ५२ पाकीट व प्रत्येक पाकीटात ३० पुडया अशा एकुण ३१,२०० पुड्या, प्रति पुडी १ रूपये दराने किं. रू.

७,७७,१२०/- रूपये एका सुतळी बारदान मध्ये ०४ पांढ-या रंगाची पोती, प्रत्येक पोत्यात केशरयुक्त विमल पान मसाला असे लिहीलेले निळया रंगाचे प्लॅस्टिकचे ५२ पाकीट व प्रत्येक पाकीटात २२ पुड्या अशा एकुण ४५७६ पुडया, प्रति पुडी ८.५० रूपये दराने प्रती बारदान किंस ३८८९६/- प्रमाणे एकुण २० बारदानाची किं. रू.

८. ४३,५६,०००/- रुपये एका सुतळी बारदान मध्ये १० पांढ-या रंगाची पोती, प्रत्येक पोत्यात केशरयुक्त पान मसाला असले लिहीलेले हिरव्या रंगाचे प्लॅस्टिकचे २२ पाकीट व प्रत्येक पाकीटात ११ पुड्या अशा एकुण २४२० पुडया, प्रति पुडी १८ रूपये दराने प्रती बारदान किंरु ४३,५६०/- प्रमाणे एकुण १०० बारदानाची किं, रू.

९. १०,००,०००/- किंमतीचे अशोक लेलण्ड कंपनीचा लाल रंगाचा माल वाहू ट्रक तिचा आर टी ओ

क्र. KA 29 A2588 असा जु. वा. किं. अं.

१०. ३०००/- रू सहा सुतळी बारदानाची नारळ असलेली पोती जु. वा. किं. अ.

७३,६०,८२०/- (व्याहत्तर लाख साठ हजार आठशे बीस रुपये)

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, उमदी पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों/सागर लवटे, दरिबा बंडगर, अमर नरळे, पोना / प्रकाश पाटील, चालक पोशि / सुशांत चिले, स्था. गु. अ. शाखा,
पोहेकॉ / आप्पासाहेब हाक्के, पोहेकों / संतोष माने, पोशि / आप्पासाहेब घोडके, उमदी

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.