प्रतिष्ठा न्यूज

मिरज शहरातील शासकीय दूध डेअरीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज शहरातील शासकीय दूध डेअरीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी, आरोपीचे नाव व पत्ता
१) गणेश रामू बजंत्री, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज
२) संतोष दत्तात्रय झळके, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज
३) आमीन मोहम्मद खान, रा. गुरुवार पेठ, नदाफ गल्ली, मिरज
४) वैभव राजू कनशेट्टी, रा. शिवाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*

मा. पोलीस अधिक्षक, सांगली श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल गिल्डा यांनी सांगली जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हयांचा वाढता आलेख पाहता विशेष पथक नेमून सदरचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे.

मिरज शहराचे मध्यवर्ती भागातील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरी या शासकीय कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर रुममधील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील सिलीकॉन स्टीलच्या पट्ट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत वर नमूद विवरणाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक श्री. जयदिप कळेकर यांचे आदेशान्वये महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण यांचे पथक सदरच्या शासकीय कार्यालयातील घरफोडी करणारे आरोपींचा अथक प्रयत्न करुन कसोसीने शोध घेत होते.

दि. २३.०९.२०२४ रोजी सदरचे पोलीस पथक यातील आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार पोकों जावेद शेख व मोसिन टिनमेकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत मिळाले खात्रीशीर गोपनीय माहीतीवरुन सदर पोलीस पथकाने यातील आरोपी नामे गणेश रामू बजंत्री, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने त्याचे साथीदार नामे १) संतोष दत्तात्रय झळके, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज, २) आमीन मोहम्मद खान, रा. गुरुवार पेठ, नदाफ गल्ली, मिरज, ३) वैभव राजू कनशेट्टी, रा. शिवाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज यांचेसोबत मिळून सदरची घरफोडी केलेचे निष्पन्न झाले. त्यावरुन इतर आरोपींचा शोध घेवून त्यांना नमूद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून सदरच्या बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीतील ट्रान्सफॉर्मर मधील एकूण १९,०५०/- रु. किंमतीच्या ३८१ किलो वजनाच्या सिलीकॉन स्टीलच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहेत.

मा. पोलीस अधिक्षक, सांगली श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल गिल्डा व सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे श्री. जयदिप कळेकर यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण या पोलीस पथकाने मिरज शहरातील शासकीय दुध डेअरी या शासकीय कार्यालयात घरफोडी करणा-या वर नमूद गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करुन सदरचा घरफोडीचा गुन्हा उघड करुन त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना चाप लावलेला असून भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर परीणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करणेत येणार आहे.

*कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक, सांगली श्री. संदीप घुगे मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितू खोखर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शानाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोसीन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.