प्रतिष्ठा न्यूज

टक्केवारीच्या आकडेवारी मध्ये भरभटलेला कुपवाड नाला नागरिकांनी केला मोकळा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कुपवाड फाट्याला नाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घरात पाणी शिरते आहे. गेली चार वर्षे झालं दसरा- दिवाळीला होणाऱ्या पावसामुळे या भागात पाणी साचून राहत आहे. या परिसराची वाट लागली आहे. विवेकानंद चौकातील रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. अनेक निवेदन देऊन झाली. रस्ता रोको करून झाला. परिसरातील बंधू-भगिनी उपस्थित राहिल्या एकमुखाने निर्णय झाला. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिरजकर, अभियंता सचिन पोळ, इरफान मुजावर ,सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे बांधकाम विभागाचे आप्पा अलकुडे,अशोक कुंभार, मदने जल निसारण विभागाचे चिदानंद कुरणे, यांनी 14 ऑक्टोंबर सोमवार पर्यंत काम चालू होणार असे आश्वासन दिले होते. पण काल झालेल्या पावसामुळे परत अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले .त्यामुळे आज सकाळी नागरिक रस्त्यावर उतरले आणि नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टदार, महापालिकेचे अधिकारी यांच्यासमोर टोकाची भूमिका घेतली व कुपवाड नाल्याचे जेसीपी ने उपकरणे काम चालू केले. सामाजिक कार्यकर्ते युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी 14 तारखेपासून जर कामाला सुरुवात नाही झाली तर ऑफिसला टाळे ठोकून काळे हसण्याचा इशारा दिला होता.
आज सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांना फोन करून याची कल्पना दिली प्रत्येक जण टाळाटाळ करत होता.पण या भागातील नागरिक संतापले होते. सर्वांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला पण तत्पूर्वी अधिकारी पोळ साहेब या ठिकाणी आले व नाला उकरणे काम चालू केले. उपस्थित आणि समोर पूर्ण नाला उकरून होत नाही तोपर्यंत तिथेच किया मांडला. अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. युवराज शिंदे यांनी अनेक अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी महादेव काळे,प्रकाश गुरव, विनायक ओगले, राजू रजपूत, शुभम गिड्डे, विजयकुमार महाजन, प्रमोद वडगावे, गिरीश रजपूत, प्रकाश चौगुले, विश्वास माने, बापूसाहेब पाटील, विजया दाभोळे,स्वाती यादव, अर्पणा माने, वैशाली भस्मे, ऋतुजा माने, प्रीती जवळे आदिनाथ आथणे ,विशाल घोरपडे, दिलीप शेंडे, एम व्ही जाधव, व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.