प्रतिष्ठा न्यूज

काटामारी विरोधातील आरपारच्या लढाईसाठी सज्ज रहा : महेश खराडे ; शिरगाव ता. तासगाव स्वाभिमानीच्या शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/ सौरभ निकम
बोरगाव : शेतकऱ्यांना साखर कारखानदार ,दूध सम्राट , अडत दुकानदार, दलाल, शासकीय यंत्रणा यासह सर्वच जण लुटत आहेत, शेतकऱ्यांना न लुटणारा तो आळशी यंदाच्या ऊस हंगामात ऊस वजनातील काटामारी विरोधात आरपार ची लढाई लढू त्या लढाईसाठी सज्ज रहा , असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले

तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी शाखा अध्यक्ष पदी सुभाष पाटील उपाध्यक्षपदी किरण मोरे खजिनदारपदी युवराज पाटील सचिवपदी कृष्णा ताबवेकर कार्याध्यक्षपदी संभाजी सुर्यवंशी व उपकार्याअध्यपदी नवनाथ पाटील यांची निवड करण्यात आलीतसेच सदस्य पदी रमेश माने बाबुराव मोहिते सुनिल कळसे बाबुराव पाटील बालाजी यादव अनिल पाटील अक्षय मोरे शंकर महाडिक बजरंग गायकवाड सहदेव कदम अतुल माने मानसिक गायकवाड निवास पाटील विकास पाटील आनंदा मोरे विलास गायकवाड गणपती मोरे राजेंद्र पाटील संदिप मोरे अजितकुमार गायकवाड राहुल पाटील सागर पाटील विकी पाटील राहुल गायकवाड विजय कदम आदीची निवड करण्यात आली.
खराडे म्हणाले ,उस उत्पादक शेतकऱ्यांना आज जो उसाचा दर मिळतोय तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळतोय, त्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेली ३० वर्षे संघर्ष सुरू आहे त्यासाठी आमचे अनेक कार्यकर्ते शहीद झाले आहेत अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे अनेकांनी लाठ्या काठ्या खाल्या आहेत त्यामुळे 300 रुप्यावरून 3000 दर करण्यात आम्हाला यश आले पण त्याची जाणीव शेतकऱ्यांना नाही याची आम्हाला खंत
वाटते आज दराच्या लढाईबरोबरच वजनातील कातामारी विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे दीड ते दोन टन वजनाचा काटा मारला जातो शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान त्यामुळे होत आहे ही चोरी दिवसा ढवळ्या सुरू आहे शेतकरी ते मुकाट पणे सहन करत आहेत कारखानदार दरोडा घालतच आहेत आता तोडणी मजूर ही दरोडा घालायला लागले आहेत मजूर म्हणून आलेली माणसे ,जगायला आलेली माणसेही शेतकऱ्यांना लुटायला लागली याला कारण शेतकरी संघटित नाही त्याला सर्वजण लुटत आहेत मग आपण का लुटू नये अशी त्याची भावना झाली आहे हे सर्व जन लुटत असताना शेतकरी त्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही आम्ही आवाज उठवतोय तर आम्हाला शेतकरी साथ देत नाही कारण शेतकरी प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून बघतो आहे आम्ही भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वाले नाही मग यांच्या मागे कशाला जायचे आपल्या नेत्याला काय वाटेल? असा विचार करतात पण यात शेतकऱ्याचे च नुकसान होते याचा विचार शेतकरी करायला तयार नाही राजकारणासाठी शेतकरी स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत आहे हे वाइट आहे अर्थकारण आणि राजकारण या दोन भिन्न बाबी आहेत शेतकऱ्यांनी अर्थकारणाला महत्व दिले पाहिजे जिथे आपले आर्थिक हित होणार आहे तिथे तरी किमान संघतनेबरोबर आले पाहिजे आमचा प्रत्येक लढा शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याचा आहे ऊस दराची, दूध दराची लढाई शेतकऱ्याचे उत्पननवाढ करणारी आहे हमी भावाची लढाई ही शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्याची आहे वजनातील काटा मारी थांबली तर शेतकऱ्याचा फायदा होईल, तोडिसाठी तर शेतकरी दोनदा पैसे देतो एकाच कामासाठी दोनदा पैसे देणारा जगात शेतकरी हा एकमेव घटक आहे तोडीचे पैसे कारखाने उस बिलातून कपात करून घेतातच त्याच तोडीसाठी मजुरालाही पैसे मोजतात म्हणजे एकाच कामासाठी दोनदा पैसे शेतकरी देतो त्या विरोधात आम्ही आवाज उठवातोय संघर्ष करतोय पण शेतकरी आम्हाला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे तलाट्यापासून ,जिल्हाधिकारी पर्यंत, दलाला पासून साखर सम्राटा पर्यंत लुटणारी व्यवस्था तयार झाली आहे ही व्यवस्था मोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर संघटित होवून बंड करायला सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी प्रा अजित हालिगले यांनीही मार्गदर्शन केले
यावेळी अनिल पाटील चंद्रकांत पाटील रविंद्र पाटील प्रतिक पाटील महादेव दिक्षित जितेंद्र पाटील विनायक शिंदे महादेव पवार शाम पवार अनिकेत शिंदे अशोक शिंदे विजय रेंदाळकर बाळु खरमाटे आदिसह उपस्थित संभाजी शिंदे अमित शिंदे वैभव सुर्वे दत्तात्रय जाधव अनिल जाधव पंढरीनाथ जाधव तानाजी जाधव सुनिल जाधव प्रदीप जाधव मनोज साळुखे निशिकांत पोतदार गौतम चंदनशिवे शांताराम पाटील ज्ञानु मोहिते नारायण पाटील अमोल पाटील लक्ष्मण चंदनशिवे अशोक पाटील भिमराव पाटील दिलीप माने सुरेश चंदनशिवे तानाजी बनसोडे हणमंत पाटील किशोर पार्लेकर शिकंदर शिकलगार मधुकर पाटील काकासो पाटील सचिन पाटील मानसिक पाटील वैभव मोरे गजानन काटकर बाळासाहेब पाटील रघुनाथ पाटील सचिन बन्ने चंद्रकांत सुतार आशिष पाटील आनंदा सुतार, अमोल माने, सुजीत माने आदीसह उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.