प्रतिष्ठा न्यूज

कुंडलिक जाधव ‘आदर्श शिक्षक ‘ पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने माध्यमिक शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.त्यामध्ये गगनबावडा येथील परशुराम विद्यालयाचे कुंडलिक महादेव जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुंडलिक जाधव हे कंत्राटी शिक्षक आहेत. त्यांचा महिन्याचा पगार ठरलेला आहे पण अन्य शिक्षकांचे मानाने खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात ५००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

कोरोना काळात, एस. टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात वाड्या वस्त्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन.

पालकांशी सतत संपर्क, बारावी बोर्ड परीक्षेचा सलग तीन वर्षे १००% निकाल यासाठी त्यांचा असणारा सिंहाचा वाटा , शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अखंड धडपड. या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा परिषदेच्या वतीने निवड केली. असे पालकवर्गात बोलले जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.