प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीत निवडून आलेल्या चौघांना अपात्र करा* संचालक महादेव पाटील यांची जिल्हा निवडणुक आयोग आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीने बाजार समितीत केलेल्या भ्रष्टाचारातुन मिळवलेल्या पैशाचा वापर करून पैसे वाटून निवडणूक जिंकली आहे असा घणाघात आज बाजार समिती संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. पुढे तें म्हणाले त्यांचा निसटता विजय झाला असून मागील निवडणुकीत असणारे अडीचशे मतांच लीड यावेळी मात्र 17 तें 25 मतांचे राहिलेले असून,आम्हांला जर तेवडी मत पडली असती तर आज चित्र वेगळं पहायला मिळाले असते.डी डी आर च्या चॊकशी अहवालात भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या चार उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तसेच विद्यमान संचालक मंडळात तें निवडून आले असून सध्या चौकशी अहवालामध्ये त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आहेे.तसेच यांना तात्काळ हटवले नाहीत तर संस्थेचे नुकसान होण्याची भीती तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  त्यामुळे अनिल पाटील,रवींद्र पाटील, धनाजी पाटील व राजाराम पाखरे यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी संचालक महादेव पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्या कडे केली आहे.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी पाठपुरावा सुरु असून डी डी आर ने नोटीस काढून भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले आहे,तसेच झालेला भ्रष्टाचार सत्ताधारी राष्ट्रवादी ला मान्य नसेल तर त्यांनी समोरासमोर यावे आम्ही आकडेवारी सह सिद्ध करायला तयार आहे असे आव्हान यावेळी सुनील पाटील यांनी दिले आहे.तसेच इथून पुढच्या काळात आम्ही निवडून आलेले सर्व संचालक आम्हाला मतदारांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिक पने पार पाडून शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडू,तसेच व्यापारी पेमेंट, बेदाणा उधळण याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलं जाईल असेही यावेळी निवडून आलेल्या संचलका कडून सांगण्यात आले.यावेळी महादेव नाना पाटील, स्वप्नील पाटील,कुमार शेटे,अविनाश पाटील सुनील पाटील, आर डी आप्पा पाटील उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.