प्रतिष्ठा न्यूज

ऊस तोडिसाठी शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या मुकादम , मजूर, चालक, स्लीप बॉय आणि मशीन मालकांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा अन्यथा कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्या ना बदडून काढू : महेश खराडे यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील ऊस तोडिसाठी मुकादम , मजूर, चालक, स्लीप बॉय आणि मशीन मालक शेतकऱ्याची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत ही एक प्रकारची खंडणीच आहे  त्यांना कारखान्यांच्या शेती विभागाची साथ आहे त्यामुळे त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा अन्यथा कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्या ना बदडून काढू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यात उसाचे  श्रेत्र सववा लाख हेक्टर आहे ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे मात्र नियमानुसार तोडणी साठी नाव आले तरी  अकरी पाच ते दहा हजार रुपये, कोयत्याला मटण , चिकन, ड्रायवर ला 500 रुपये एंट्री दिली  तरच ऊस तोडला जातो जो शेतकरी पैसे देत नाही त्याचा ऊस तोडला जात नाही तो पैसे वाला शेतकरी  जास्तीचे पैसे देवून ऊस तोडून घेतो छोट्या पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना ना इलाजाने  उसन वारी करून तोडी  साठी पैसे द्यावे लागत आहेत तीच अवस्था मशीन मालकाची आहे तेही शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे वसूल करत आहेत या सर्वांना कारखानदार , त्याचा शेती अधिकारी , स्लीप बॉय याचीही साथ आहे त्यामुळे या सर्वावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे अन्यथा कायदा हातात घेवून पैसे मागणाऱ्या ना बदडून काढण्या शिवाय पर्याय राहणार नाही
*शेतकऱ्यांनी पुरावे तयार करावेत*
शेतकऱ्यांनी पैसे माग ताना मोबाईल रेकॉर्डिंग करावे तसेच पैसे देताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे म्हणजे पोलीस स्टेशन, कारखाना आणि साखर आयुक्तांच्या कडे तक्रार करताना हे पुरावे उपयोगी पडतील त्यामुळे शेतकऱ्यांनी ही थोडी हुशारी आणि सावध गिरी बाळगणे गरजेचे आहे मुकादम व मशीन मालकाचे  नाव गाव वाहन नंबर , आदींची बिन चूक माहिती तक्रार करताना लागते त्यामुळे याचीही माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन खराडे यांनी केले आहे यावेळी प्रा अजित हलिगळे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.